मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी(Dr. Manohar Joshi) यांचं निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital)दाखल करण्यात आले होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 03 वाजून 02 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांची संपूर्ण कारकीर्द कशी होती यावर आपण एक नजर टाकुयात..
मनोहर जोशी यांचा संघर्षमय प्रवास :
मनोहर जोशींचे वडील त्याकाळी भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही देखील भिक्षुकी करु लागले. एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. मात्र शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळे मनोहर जोशी(Manohar Joshi)) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकले आणि शिक्षक झाले. कमवा आणि शिका या तंत्राने ते लहानपणापासून संघर्ष करत होते.
मनोहर जोशी यांचा जन्म 02 डिसेंबर 1937 या दिवशी रायगड(Rayagada) जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्यांनी शिक्षण घेतलं.
किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या 27 व्या वर्षी मनोहर जोशी ते एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.
जोशी सरांचा राजकीय प्रवास :
▪️नगरसेवक (2 टर्म)
▪️विधानपरिषद सदस्य (3 टर्म)
▪️मुंबईचे महापौर (1976 ते 1977)
▪️विधानसभा सदस्य (दोन टर्म्स)
▪️महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – 1995 ते 1999
▪️केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (1999 ते 2002)
▪️लोकसभा अध्यक्ष (2002 ते 2004)
▪️राज्यसभेचे खासदार (2006 ते 2012)