राज्यपालांच्या उपस्थितीत ‘माय लेकरं’ कार्यक्रम संपन्न
मराठी भाषा हा हिरा; त्याचे जतन व्हावे
मुंबई : तामिळ भाषेला अभिजात दर्जा मिळावा या साठी फार मोठा संघर्ष करावा लागला होता. मराठीला त्या तुलनेने कमी प्रयत्नाने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची मराठी हा अस्सल हिरा असून या हिऱ्याचे जतन केले तर संस्कृती टिकेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २७) राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मराठी अभिवाचन, काव्यवाचन व गायनाचा ‘माय लेकरं’ हा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी दोन तासांचा हा कार्यक्रम संपूर्णवेळ उपस्थित राहून पाहिला.
प्रत्येकाने किमान एक मराठी वृत्तपत्र घरी आणावे, राज्यपालांचे आवाहन
आपण राज्यपाल पदावर असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपले भाग्य आहे असे सांगून आपल्याजवळ हिरा आहे ही ज्याला जाणीव नाही तो त्याचा पेपरवेट म्हणून उपयोग करतो; तसे भाषेच्या बाबतीत होऊ नये असे राज्यपालांनी सांगितले. जीवनात आई मुलाचे नाते विलक्षण असून राजमाता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्र व तामिळनाडूच्या सांस्कृतिक संबंधाबाबत बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तामिळनाडू अभियानाची आठवण केली. शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील जिंजी किल्ला जिंकला होता तसेच वेल्लोरचा देखील त्यांचा संबंध होता असे सांगून शिवाजी महाराजांच्या काळात तंजावर येथे व्यंकोजी राजे व पुढे सरफोजी राजे भोसले यांचे राज्य आले होते असे त्यांनी सांगितले. तंजावर येथे भोसले घराण्याने यांनी केवळ मराठी भाषा व संस्कृतीचे जतन केले असे नाही तर त्यांनी तेथील भव्य अश्या सरस्वती महाल ग्रंथालयात दुर्मिळ तामिळ साहित्याचे देखील जतन केले असे राज्यपालांनी सांगितले.
काळानुरूप इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक झाले आहे व आज सर्वच प्रदेशातील लोक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. मात्र प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या घरी आग्रहाने मराठी भाषा बोलली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आला असून अनेक विद्यापीठांमध्ये आज पुस्तकांचे मराठी भाषांतर केले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आज भाषिक लिखाणाचा लोकांना सराव राहिला नसून प्रत्येकाने घरी किमान एक मराठी वृत्तपत्र घेऊन वाचले पाहिजे व लिखाणाचा देखील सराव केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. पालकांनी मुलांना दिवसातून किमान एक पान तरी मराठी वाचण्यास प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे येथील ‘कलागंण’ या संस्थेच्या वतीने ‘माय लेकरं’ हा आई आणि मूल यांच्या नात्याचा गोफ उलगडणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ अरुणा ढेरे यांची संकल्पना व संहिता असलेल्या या कार्यक्रमात डॉ गिरीश ओक(Dr. Girish Oak) व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni )यांनी आपल्या अभिवाचनानें तर कलांगणच्या संस्थापिका गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या सुरेल काव्यवाचनाने राज्यपालांसह उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी यांच्यापासून अनेक नव्या जुन्या लेखक कवींच्या आई व मूल नात्यांसंबंधी उताऱ्यांचे व कवितांचे भाववाचन करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती तसेच कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित दाते यांनी केले तर चैत्राली अभ्यंकर यांनी आभारप्रदर्शन केले.
Bhosles of Thanjavur preserved Tamil alongwith Marathi literature
Maharashtra Governor C. P. Radhakrishnan witnessed a Marathi prose and poetry recitation and singing programme ‘Maay Lekare’ organised on the occasion of ‘Marathi Bhasha Gaurav Din’ at Raj Bhavan Mumbai on Thu (27 Feb). The birth anniversary of Jnanpith awardee writer poet V V Shirwadkar ‘Kusumagraj’ was celebrated as Marathi Bhasha Gaurav Din.
Speaking on the occasion, the Governor expressed happiness over the classical language status accorded by the Centre to Marathi language during his tenure.
Stating that culture will be preserved if the language is preserved, the Governor appealed to the people to speak Marathi at home and to encourage children to speak at least one page everyday.
Speaking about the strong cultural bonds between Maharashtra and Tamil Nadu, the Governor recalled the conquests by Chhatrapati Shivaji Maharaj in Jinjee and Vellore. He said Vyankoji Bhosle and later Sarfoji Bhonsale preserved Tamil language and literature while preserving Marathi culture at Thanjavur in Tamil Nadu. He said the Saraswathi Mahal Library as Thanavore is a repository of books from both languages.
The programme titled ‘Maay Lekare’ (mother and child) was organised by ‘Kalangan’ Charitable Trust, a cultural organisation based in Pune. The programme consisted of emotional and heartfelt recitation and singing highlighted the profound relationship between mother and child.
The programme was conceptualised and curated by Dr. Aruna Dhere. Veteran actor Dr. Girish Oak and Mrinal Kulkarni read out the prose and poetry while founder of ‘Kalangan’ Chaitraly Abhyankar rendered the songs.
Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Deputy Secretary S Ramamoorthy, compere Adv Amit Date, people from the field of art, music and literature were present