मायबोली मराठीच्या प्रांतात अभिव्यक्तीची, बोलीभाषेची आणि शब्दसारस्वताची माणिकशिंपली जागोजागी आढळून येतात..ज्ञानेश्वरापासून ग्रामीण बोलीतील बहिणाबाई पर्यंत शब्द, साहित्य आणि संस्कृतीची पखरण करणारी ही मायबोली..अशीच ग्रामीण भागातील ही एक गृहिणी तिच्या मनातील भावना मांडताना काय म्हणते आहे पाहूया…