मराठी भाषा दिन…… अमृतातेही पैजा जिंके!…

मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा दिवस, अथवा मराठी राजभाषा दिन

हा दिवस जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.

मराठी साहित्यकार तात्यासाहेब तथा विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.

जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन साजरा होतो.

मराठी बोली आणि तिचा विकास.

मराठी भाषा शिकण्यासाठी डॉ. दत्तात्रय पुंडे, जोशी , कालेलकर इ.ची पुस्तके घेतली होती. ती वाचत असतांना त्यात दिलेले बोली भाषेचे काही मजेदार नमुने आढळले. ते वाचुन बोली भाषांचे महत्व नव्याने लक्षात आले. इतर भाषातज्ञांच्या मते साधारण असे मानण्यात येते की. एकभाषक समाजाच्या एका गटाकडुन किंवा एकभाषक समाजाच्या एखाद्या विशीष्ट प्रदेशातील लोकांकडुन देवाणघेवाणीसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट भाषिक रुपास बोली असे म्हणतात.

संपुर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडुन बोलल्या जातात त्या मराठीच्या विवीध बोली. त्यातील एक बोली प्रमाण बोली आहे इतर बोली या प्रमाण बोलींपासुन स्वनिमप्रक्रिया, व्याकरणप्रक्रिया, आणि शब्दसंग्रह यांच्या बाबतीत कमीअधिक दुर आहेत. तथापि प्रमाण बोली इतकेच या प्रत्येक बोलीला महत्व आहे. कारण बोली ह्या त्या त्या भाषकांचा सामाजिक-सांस्कृतिक वारसाच असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, त्याच्या संस्कृतीचा परिचय करुन घेण्याचे एक साधन म्हणुन मराठीच्या बोलींकडे पाहिले पाहीजे. बोली संदर्भात डॉं. ना.गो. कालेलकर म्हणतात ” बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे. परीस्थीतीला अनुरुप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते. मुखपरंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. ती साधी पण परीणामकारक असते. तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट्य असते.”

. . . अमृतातेही पैजा जिंके!

‘माझीया मऱ्हाटीचे बोलू कवतिके, अमृतातेही पैजा जिंके’ असे ज्या ज्ञानेश्वर माऊलीने सांगून ठेवले आहे, त्यांच्या त्या बोलांचे कवतिक आजच्या विज्ञानाच्या युगातही आपण सारे अनुभवत आहोत. आज जागतिक मायबोली दिन आहे. त्यांचा ऐतिहासिक संबंध काय आहे त्याची थोडक्यात येथेओळख करून घेवूया आणि दर १२ कोसागणिक बदलत जाणा-या मायबोली मराठी भाषेच्या वैभवाची महती आज जाणून घेवूया. सन १९५२मध्ये बांगलादेशामध्ये चार विद्यार्थ्यांनी बंगाली भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा म्हणून हौतात्म्य पत्करले. १९७१मध्ये बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हा दिवससाजरा करण्यात यावा असा युनेस्कोमध्ये आग्रह धरला आणि अखेर अनेकवर्षांच्या पाठपुराव्यानंतर शहिदांच्या आठवणीसाठी संयुक्त राष्ट्रांनी २१ फेब्रुवारी हा दिवस इंटरनँशनल मदरटंग डे म्हणजे मायबोली दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन सर्वप्रथम सन २००० मध्ये केले. तेंव्हा पासून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मायबोली दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे असा याचा संक्षिप्त इतिहास आहे.

मायबोलीचे वैभव, अस्मिता आणि अस्तित्व जपण्याचा संदेश आजच्या दिवशी दिला जातो. सुदैवाने ही गोष्ट आपल्या म-हाटी मुलूखात संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला सात दशकांपूर्वीच सांगून ठेवली आहे, मायबोलीचे महत्व आज जगभरात मान्यता पावले आहे. मायबोलीत शिक्षण घेण्यावर आजच्या काळात तज्ज्ञांनी विशेष भर दिलेला आपण पाहतो, या मागच्या जाणिवा अश्या आहेत की मातृभाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी अन्य विद्यार्थ्याच्या तुलनेत अधिक प्रभावी, आणि मेधावी असतात असे संशाधनांती दिसून आले आहे. मराठी ही केवळ बोली भाषा न राहता ती राजभाषा व्हावी म्हणून छत्रपती शिवरायांनी त्या काळात राजभाषा कोष तयार केले. स्वा सावरकर यांची भाषाशुध्दी चळवळ तर आपण जाणतोच. येत्या २७ तारखेला ज्यांच्या जन्मदिनी आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो त्या कुसूमागर्जांनी देखील मराठी ही केवळ बोली भाषा न राहता ती ज्ञानभाषा झाली पाहिजे असा अग्रह धरला होता.

मायबोलीत वृत्तसेवा देणारी एकही संस्था नसावी आता पहा माझ्या मराठी मायबोलीचे वैभव! मराठीच्या बोलीभाषा किती आणि कोणत्या आहेत माहिती आहे का? दर १२ कोसागणिक बोली बदलते, ही हिचे वैशिष्ट्य त्यामुळे मराठीच्या नाना त-हा, आणि प्रांतागणिक वेगळा खुमार तुम्हाला पहायला मिळेल. तर पहा मराठी बोलीच्या छटा किती वैविध्यपूर्ण आह.

काणकोणचीकोकणी : कोकणी खानदेशी • • चंदगडी • • तंजावर मराठी • • तावडी • • बाणकोटी • • बेळगावी मराठी • • मालवणी • • वर्‍हाडी • • पूर्व मावळी बोलीभाषा • • कोल्हापुरी • • सोलापुरी • • गडहिंग्लज (पूर्व)

ईस्ट इंडियन,मुंबई • • अहिराणी • • आगरी • • कादोडी • • कोलामी • • चित्पावनी • • जुदाव मराठी • • नारायणपेठी बोली • • वाघरी • • नंदीवाले बोलीभाषा • • नाथपंथी देवरी बोलीभाषा • • नॉ लिंग बोलीभाषा-मुरूड-कोलाई-रायगड • •पांचाळविश्वकर्मा बोलीभाषा • • गामीत बोलीभाषा • • ह(ल/ळ)बी बोलीभाषा • • माडीया बोलीभाषा • • मल्हार कोळी बोलीभाषा • •मांगेली बोलीभाषा • • मांगगारुडी बोलीभाषा • • मठवाडी बोलीभाषा • • मावची बोलीभाषा • • टकाडी बोलीभाषा • • ठा(क/कु)री बोलीभाषा • • ‘आरे मराठी बोलीभाषा • • जिप्सी बोली(बंजारा) बोलीभाषा • • कोलाम/मी बोलीभाषा • • यवतमाळी (दखनी) बोलीभाषा • • मिरज (दख्खनी) बोलीभाषा • • जव्हार बोलीभाषा • • पोवारी बोलीभाषा • • पावरा बोलीभाषा • • भिल्ली बोलीभाषा • • धामी बोलीभाषा • • छत्तीसगडी बोलीभाषा • • भिल्ली (नासिक) बोलीभाषा • • बागलाणी बोलीभाषा • • भिल्ली (खानदेश) बोलीभाषा • • भिल्ली (सातपुडा) बोलीभाषा • • देहवाळी बोलीभाषा • • कोटली बोलीभाषा • • भिल्ली (निमार) बोलीभाषा • • कोहळी बोलीभाषा • • कातकरी बोलीभाषा • • कोकणा बोलीभाषा • • कोरकू बोलीभाषा • • परधानी बोलीभाषा • •भिलालांची निमाडी बोलीभाषा • • मथवाडी बोलीभाषा • • मल्हार कोळी बोलीभाषा • • माडिया बोलीभाषा • • वारली बोलीभाषा • •हलबी बोलीभाषा • • ढोरकोळी बोलीभाषा • • कुचकोरवी बोलीभाषा • • कोल्हाटी बोलीभाषा • • गोल्ला बोलीभाषा • • गोसावी बोलीभाषा • • घिसाडी बोलीभाषा • • चितोडिया बोलीभाषा • • छप्परबंद बोलीभाषा • • डोंबारी बोलीभाषा • • नाथपंथी डवरी बोलीभाषा • • पारोशी मांग बोलीभाषा • • बेलदार बोलीभाषा • • वडारी बोलीभाषा • • वैदू बोलीभाषा • • दखनी उर्दू बोलीभाषा • •महाराष्ट्रीय सिंधी बोलीभाषा • • मेहाली बोलीभाषा • • सिद्दी बोलीभाषा • • बाणकोटी बोलीभाषा • • क्षत्रीय बोलीभाषा • • पद्ये बोलीभाषा अशी मराठी मायबोलीची नानाविध रूपे आहेत.

 

Social Media