वरुण धवन आणि नताशा दलालचे लग्न, या दिवशी पार पडणार विवाहसोहळा?

मुंबई : बॉलिवूड  चित्रपट अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलालचे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. वृत्तानुसार,  वरुण धवन आणि नताशा दलाल 22 ते 26 जानेवारी दरम्यान अलिबागमध्ये लग्न करणार आहेत. वरुण धवनच्या लग्नाबद्दल सांगण्यात येत आहे की फॅशन डिझायनर असलेली त्याची मैत्रीण नताशा ही त्या दोघांच्या लग्नाच्या वेळी  स्वत:चे डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहे.

नताशा दलाल अनेक प्रसंगी देसी लूकमध्ये दिसली आहे, ज्याला बरीच पसंतीही मिळाली आहे. या दोघांच्याही लग्नाबाबत अद्याप दोन्ही कुटुंबांकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. परंतु वरुणचे काका आणि अभिनेता अनिल धवन याबद्दल बोलले आहेत. लग्नाबद्दल वरुण खूप उत्साही आहे आणि  वरुण धवनला खूप मोठे आणि भव्य लग्न करण्याऐवजी  कुटुंबातील सदस्यांपुरतेच मर्यादित ठेवायचे आहे.

मागील वर्षाच्या सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की वरुण धवन थायलंडमध्ये एका भव्य आयोजनात लग्न करणार आहे. मात्र त्यानंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले. आता या वेळी काय होते ते पाहूया. वरुण धवन आणि नताशा दलाल बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

या दोघांची बरीच छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. हे दोघेही बऱ्याचदा एकमेकांसमवेत स्पॉट झाले आहेत. शाळेपासूनच हे दोघेही एकमेकांना आवडतात. वरुण धवनने खुलासा केला होता की नताशा दलालने त्याला बर्‍याच वेळा नाकारले होते तरीही ती त्याला आवडतच होती.

Tag-Marriage of Varun Dhawan/Natasha Dalal

Social Media