मेघा धाडे लावणी : ‘लावणीच्या नावाखाली बार डान्स करणाऱ्यांना चपलेने मारले पाहिजे,’ असे मत मेघा धाडेने व्यक्त केले. तिने आयोजकांनाही
फटकारत म्हटले की, “या मुलींना पैशांसाठी असे करायला लावणाऱ्या आयोजकांना जेलमध्ये टाका.”
अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे(Megha Dhade) तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या
एका प्रतिक्रियेत तिने लावणीच्या नावाखाली बार डान्स करणाऱ्यांवर आणि त्यांना बोलावणाऱ्या आयोजकांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
“लावणीच्या नावाखाली ज्या
मुली खुलेआम बार डान्स करतात, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सोशल मीडियावर ज्या रील येतात त्या बघून चपलीने झोडावंसं वाटतं मला एकेकीला,”
असे ती ‘झी 24 तास’शी बोलताना म्हणाली. पारंपरिक लावणी आणि लावणीच्या नावाखाली होणारा बार डान्स यातील फरकावरून तिने हे भाष्य केले असून,
तिचा रोख नेमका कोणावर, याची चर्चा सध्या सुरू आहे.
काय म्हणाल्या मेघा धाडे (मेघा-धाडे-लावणी)
मेघा धाडे म्हणाल्या की, “आज ज्या कोणी बार डान्स(Bar dance) करणाऱ्या मुली आहेत आणि त्यांचे आयोजक आहेत, त्यांना मी चपलीने झोडू इच्छिते,
मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. मला बाप्पांमुळे तोंडातून शब्द काढता येत नाहीत, पण तुम्हाला वाटत असेल की या लोकांमुळे तुमच्या पक्षाचे भले होईल,
लोक जमतील, कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. लावणीच्या नावाखाली खुलेआम बार डान्स करणाऱ्या या मुलींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.”
मेघा धाडे यांनी दहीहंडी कार्यक्रमांमधील महिलांच्या सहभागावर आणि त्यांच्या नृत्यावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “त्यांचे बीभत्स नाचणे आणि
प्रेक्षकांसोवाचा संवाद दहीहंडी कार्यक्रमांना आवश्यक नाही. या महिलांना तुरुंगात टाकले पाहिजे.” त्यांनी केतकी चितळेचे उदाहरण दिले, जिला कवितेमुळे
४० दिवस तुरुंगात ठेवले होते. धाडे यांनी स्टेजवरील ‘ओपन बारडान्स’ लावणार्या महिलांवरही टीका केली आणि विचारले की या नंगानाचावर कोणीच
आळा का घालत नाही. पैसा मिळत असल्याने या महिला लावणीच्या नावाखाली स्टेजवर उघडपणे नाचतात, असे त्या म्हणाल्या. त्यांनी कोणाचेही
नाव घेतले नसले तरी, त्यांचे बोलणे नेमके कोणाला उद्देशून होते यावर चर्चा सुरू आहे.
Publish by – SanvadMedia
मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या
हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणानंतर सुशांत सतत रडत होता? रूममेटचा दावा