लताजी आपल्यात नेहमीच राहणार आहेत त्याच्या सुमुधुर गाण्यांमधून…एकही दिवस जात नाही त्यांचं गाणं आपण ऐकलं नाही …त्या त्यांच्या गाण्यांमध्ये नेहमीच आपल्याला त्या असल्याची जाणीव करून देतील…त्यांना कुणी विसरुच शकत नाही…इतकं त्यांनी त्यांच्या गण्याद्वारे आणि एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या मनात घर केले आहे सगळ्यांची सकाळ ही लताजींच्या गाण्यांनी गेली अनेक अनेक वर्षे होत आली आहे….त्यांनी अशी शेकडो गाणी गायली आहेत ज्यात त्यांनी अक्षरशः जीव ओतला आहे..त्यांच्या आवाजाने आपल्या गानकोकिळेने ही गाणी सुदधा अमर केली आहेत.
आपल्या भारताची शान होत्या लताजी ..असं नशीब मिळायला खूप भाग्य आणि चांगले कर्म लागतात तेव्हा अशी लताजींसारखी अद्वितीय आणि असामान्य व्यक्ती जन्माला येते…जरी आपण कधी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही आहोत तरी त्या आपल्या घरातल्या एक सदस्य कधी झाल्या हे आज कळतंय जेव्हा त्यांनी हा देह सोडला…व्यक्ती म्हंटलं की ती कधी तरी हे जग सोडून जाणारच पण लताजींसारखी व्यक्ती अमर होत असते आपल्या अद्वितीय कार्याने…त्यांच्या आवाजाला मरण नाही…हाच त्यांना मिळालेला आशीर्वाद आहे…की…नाम गुम जायगा..चेहरा ये बदल जायगा ..मेरी आवाज ही पहचान है…गर याद रहे…भावपूर्ण श्रद्धांजली…जय श्रीराम
योगिता बडवे
गायिका, पुणे