कृती सेनॉनचा ‘मिमी’ चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म होणार प्रदर्शित!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन(Kriti Sanon) आता वेगळ्या अंदाजात पडद्यावर दिसून येणार आहे. यावेळी कृतीने जी भूमिका निवडली आहे ती भूमिका तिच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. या चित्रपटाचे नाव ‘मिमी’ (Mimi)असून यामुळे कृती सध्या चर्चेत आली आहे. ९ जुलै रोजी या चित्रपटाचा पहिला पोस्टर जारी करण्यात आला होता आणि आता ‘मिमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाईल.

 

कृती सेनॉन ने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर सामायिक केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जारी केली आहे. पोस्टर मध्ये कृती सेनॉनसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर दिसून येत आहेत. हा पोस्टर सामायिक करताना कृती ने कॅप्शन मध्ये असे लिहिले आहे की, ‘या जुलैमध्ये, अनपेक्षित प्रस्ताव माझे आयुष्य बदलून टाकेल! #MimiTrailer तीन दिवसांत म्हणजेच मंगळवारी प्रदर्शित केला जाईल. ’

 

या चित्रपटात मनोज पाहवा आणि सुप्रिया पाठक हे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. तर, ‘मिमी’ व्यतिरिक्त कृती सेनॉन अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. अक्षय कुमारसोबत ती बच्चन पांड्ये चित्रपटात दिसणार असून यापूर्वी हाउसफुल४ मध्ये ती अक्षयसोबत दिसून आली होती. तसेच कृती प्रभाससोबत आदिपुरूष या चित्रपटात देखील दिसून येणार आहे.

Kriti Sanon and Pankaj Tripathi starrer ‘Mimi’ to release on Netflix on this date, see poster

Social Media