‘मिर्झापूर 3’ वेबसिरीजच्या रिलीजची तारीख आली समोर! ‘या’ दिवशी होणार रिलीज

मुंबई : चाहते मिर्झापूर 3(Mirzapur 3) या वेबसिरीजचे आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. निर्मात्यांनी ‘मिर्झापूर 3’ वेबसिरीजची (Mirzapur 3)रिलीज डेट जाहीर केली आहे.

‘मिर्झापूर’ वेबसिरीजचे 2 सिझन चांगलेच हिट झाले आहेत. या क्राईम-ड्रामाच्या तिसऱ्या सीझनची जोरदार चर्चा आहे. मात्र आता ‘मिर्झापूर 3’ वेबसिरीज 5 जुलैला रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना प्राइम व्हिडिओवर ही वेबसिरीज पाहता येणार आहे.

या सिरीजच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करताना प्राइम व्हिडिओने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर सिरीजचे नवीन पोस्टर जारी केले आहे.

Social Media