सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन सुद्धा नामंजूर केला आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले. दरम्यान प्रकरणी संवेदनशील कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नितेश राणे हे न्यायलयाबाहेर पडताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने राणे समर्थक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली , मात्र काही वेळातच नितेश राणे बाहेर पडले आणि कणकवली ला रवाना झाले , आजच सायंकाळी ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.