दिविजा वृद्धाश्रमार्फत मिठबाव येथे मोफत मोबाईल दंत चिकित्सक शिबीर : 60 जणांची झाली तपासणी

सिंधुदुर्ग  : मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 जणांची दातांची तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. असलदेतील स्वस्तिक फाऊंडेशन(Swastika Foundation) संचलित दिविजा वृद्धाश्रमा(Divija Old Age Home)कडून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसह गोर-गरिबांसाठी विविध ठिकाणी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. खेड्या-पाड्यातील गोर गरीब जनतेला दातांचे उपचार करणे पैशा अभावी शक्य होत नाही. ग्रामीण खेड्या-पाड्यात दंत चिकित्सा दवाखाने नसल्याने दातांचे इलाज करणे वयोवृद्ध लोकांना शक्य होत नाही. अश्या लोकांच्या सेवेसाठी दिविजा वृद्धाश्रमाने त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी मोबाईल दंत चिकित्सक शिबिराचे (Mobile dentist camp)आयोजन केले होते.

मागील महिन्यात असलदे गावठण येथे या शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी जवळ-जवळ १२५ लोकांनी लाभ घेतला होता. त्यातील ४५ जणांचे खराब, हलत असणारे दात काढण्यात आले. तर ३० जणांचे दात स्वच्छ करण्यात आले. कवळी बसवणे, रूट कॅनल, किडलेले दात साफ करण्यात आले. साफ करून त्यात सिमेंट भरण्यात आले. तर या महिन्यात १५ तारखेला अशाच डेंटल मोबाईल व्हॅन चे आयोजन करून मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 च्या परिसरात दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. तेथे ६० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये व अविनाश फाटक ह्यांनी केले.

या शिबिरात मुंबईहून डॉ किसन गारगोटे व डॉ ऋतिक गारगोटे यांनी रुग्णाचे उपचार केले. तर संस्थेचे सदस्य संजय धवन यांनी मदतीचा हातभार लावला. या कार्यक्रमास मिठबाव गावचे ग्रामस्थ व दिविजा वृद्धाश्रम मधील कर्मचारी उपस्थित होते.


1. मिठबाव : येथे आयोजित केलेल्या मोबाईल दंत चिकित्सा शिबिरामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या दातांची तपासणी केली.
2. मिठबाव : येथे आयोजित केलेल्या मोबाईल दंत चिकित्सा शिबिराचे उद्घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *