मुंबई : चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाविषयीच्या गोष्टी समोर येणे हे काही नवीन नाही. आता एक २८ वर्षांची मॉडेल, कलाकार आणि गीतकारने बॉलिवूडच्या नऊ दिग्गजांविरूद्ध लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या मॉडेलचा आरोप आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक लोकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेने आपली तक्रार पोलीस उपायुक्त झोन १०, डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली आहे त्यानंतर त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तक्रार नोंदविण्याचे निर्देश दिले. मॉडेलने १८ मे रोजी तिची तक्रार नोंदविली आहे आणि आरोप केले आहेत की लैंगिक आत्याचाराच्या घटना २०१३ ते २०१९ दरम्यान झाल्या आहेत.
मॉडेलद्वारे दाखल केलेल्या एफआरआय मध्ये ९ हाय प्रोफाइल व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत. एफआरआय मध्ये प्रसिद्ध फोटोग्राफर कोल्टन जूलियन, क्वान एंटरटेन्मेंटचे सह-संस्थापक अनिर्बान ब्लाह, निर्माता जॅकी भगनानी, टी-सीरीजचे कृष्ण कुमार, एएचएचे सीईओ अजित ठाकूर, जीरोधा चे सह-संस्थापक निखिल कामत, निर्माता विष्णू इंदूरी, शील गुप्ता आणि गुरज्योत सिंह या नावांचा समावेश आहे.
या मॉडेलने यापूर्वी १२ एप्रिल रोजी समूह माध्यमांवर एक मोठी पोस्ट सामायिक केली होती त्यामध्ये तिने लिहिले होते की, गेल्या काही वर्षांमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, ‘सर्व घटना २०१३ ते २०१९ या काळात (४ वर्ष) झाल्या. मी अकरा लोकांवर आरोप केले आहेत, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की मुंबईबाहेरील घटनांची तक्रार ते नोंदवू शकत नाही. पुढे तिने सांगितले की, मी डीसीपी महेश्वर रेड्डी यांना १ एप्रिल रोजी भेटले होते, परंतु एफआरआय २६ मे रोजी नोंदविण्यात आला.’
Model accuses 9 big names of Bollywood including Jackky Bhagnani of sexual abuse, FIR registered
एनसीबीचे अधिकारी आता सिद्धार्थ पिठानीची ड्रग्स प्रकरणाबाबत करणार चौकशी –