मुंबई : महाकुंभमध्ये प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला(monalisa) नायिका व्हायचे आहे. सोशल मीडियावर महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. महाकुंभात रुद्राक्ष आणि इतर रत्नांच्या माळा विकणाऱ्या एका साध्या मुलीने मेकओव्हर केला आहे.
त्याचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोनालिसा इतकी प्रसिद्ध झाली आहे की आता चित्रपट निर्मातेही तिला चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय, मोनालिसाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, जर तिला संधी मिळाली तर ती नक्कीच चित्रपटांमध्ये काम करेल.Trending-social-media-viral-girls-monalisa