Monkeypox virusबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी, लक्षणे दिसू लागताच प्रयोगशाळेत चाचणी करणे आवश्यक 

मुंबई : जगभरातील विविध देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत या धोकादायक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, आत्तापर्यंत भारतात या आजाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. असे असतानाही भारत सरकारने सतर्क राहण्यास सांगितले आहे. मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना मंत्रालयाने म्हटले आहे की मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला 21 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल.

मंकीपॉक्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox virus)लक्षणे दिसली, तर प्रथम प्रयोगशाळेत चाचणी केली जाईल, त्यानंतरच त्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी होईल. मंकीपॉक्ससाठी डीएनए चाचणी आणि पीसीआर वैध असेल, असेही मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. या व्यतिरिक्त, इतर कोणतीही चाचणी वैध नाही. पुढील मार्गदर्शक तत्त्वांनुसार,

राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये समोर येणाऱ्या प्रकरणांच्या एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रमांतर्गत, नमुने पुण्यातील ICMR NIB च्या उच्च प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. जिथे त्याची पूर्णता तपासली जाईल. यासोबतच आजारी व्यक्तीची काळजी घेणे, निदान करणे आणि त्याच्या केसचा सखोल अभ्यास करणे असेही सांगण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दक्षता घेण्याबाबत, असे म्हटले आहे की एखाद्याने पीडित व्यक्तीच्या संपर्कापासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे जेणेकरून त्याचा प्रसार रोखता येईल. आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी मृत किंवा जिवंत उंदीर, गिलहरी आणि माकडांसह लहान सस्तन प्राण्यांशी संपर्क टाळावा.


Monkey Poxचा मुंबईला धोका, महापालिकेनं उचलली महत्त्वाची पावलं

 

Social Media