मंकी बात…

विरोधीपक्षांना संपविण्याच्या नादात भाजपची अवस्था ‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये’?
हमखास विजयी होण्याची शक्यता असणा-या कॉंग्रेसच्या सहा ते आठ उमेदवारांना पळवून जिंकण्याची मोदी की गँरंटी? : राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा!

 

किशोर आपटे

भाजपला महाराष्ट्रात २०१९नंतर ज्या प्रकारच्या सत्ता आणि अधिकाराचा वापर करून घेत पक्षाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करावा लागला त्यात भाजपची अवस्था सत्ताधारी पक्ष म्हणून विरोधीपक्षांना संपविण्याच्या नादात ‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये’ अशी झाली आहे. त्याचे कारण काय तर शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस सगळ्या पक्षातून फोडलेले नेते घेतले तरी निवडून येण्याची ‘गँरंटी’ हा परवलीचा शब्द असल्याने नेमका कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच कायम आहे. त्यात मित्रपक्ष म्हणून ज्यांना सोबत खेचून आणले  आहे ते त्यांच्या चिन्हावर विजयी झाले तर नंतर सोबत राहतील की नाही याची काही गँरंटी राहिली नसल्याने भाजपला स्वत:च्या चिन्हावर किमान ३८ जागा लढायच्याच आहेत.

मुंबई दि. ८ : लोकसभा निवडणुक २०२४ (Lok Sabha Elections 2024)सत्ताधारी भाजपसाठी खूपच प्रतिष्ठेची निवडणूक आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात(Maharashtra) यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा खूपच वेगळ्या परिस्थीतीचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपा विरोधी आघाडी करत निकराचा लढा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण महत्वाच्या तीन चार पक्षांसाठी हा राजकीय अस्तित्वाचा लढा ठरला आहे.

एकूण महाराष्ट्र किंवा देशभराचा विचार केला तर भाजपला महाराष्ट्रात २०१९नंतर ज्या प्रकारच्या सत्ता आणि अधिकाराचा वापर करून घेत पक्षाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करावा लागला त्यात भाजपची अवस्था सत्ताधारी पक्ष म्हणून विरोधीपक्षांना संपविण्याच्या नादात ‘मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये’ अशी झाली आहे. त्याचे कारण काय तर शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस सगळ्या पक्षातून फोडलेले नेते घेतले तरी निवडून येण्याची ‘गँरंटी’ हा परवलीचा शब्द असल्याने नेमका कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच कायम आहे. त्यात मित्रपक्ष म्हणून ज्यांना सोबत खेचून आणले  आहे ते त्यांच्या चिन्हावर विजयी झाले तर नंतर सोबत राहतील की नाही याची काही गँरंटी राहिली नसल्याने भाजपला स्वत:च्या चिन्हावर किमान ३८ जागा लढायच्याच आहेत. आणि दहा जागा अन्य चिन्हावर मित्रपक्षाना द्यायच्या आहेत कारण २०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा नंतर पलटी मारत महाविकास आघाडीत सत्ता मिळवली होती हा प्रयोग आता सारे पक्ष एकत्र येत देशात करण्याची भिती मोदी आणि शहा यांना आहे म्हणून त्यांना चिन्हावर हमखास आपल्या आज्ञेत नंतरही राहतील असे खासदार निवडून आणायचे आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात आयारामामुळे मूळ भाजपमधील कँडर मे डर है आणि निष्ठावंताच्या नाराजीचे पर्व सुरू आहे. मात्र दिल्ली दरबारी याची काही दाद फिर्याद घेतली जाणार नसून ओझ्याच्या गाढवासारखे कार्यकर्त्याना मुकी बिचारी कुणी हाका अशी देव आज्ञा पाळावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतून कुणा “ब्लु आईड बॉय अथवा गर्ल” ला उमेदवारी दिली जाणार आहे याची वाट बघत सारे श्वास रोखून बसले आहेत. तर शिंदे यांच्या सेनेत देखील भाजप सगळ्याच जागा चिन्हासह गिळणार असेल तर आपले आस्तित्व तरी कसे शाबून रहायचे आणि कोणत्या तोंडाने मतदाराना सामोरे जायचे असा पेच पडला आहे. तिच अवस्था राष्ट्रवादीत आहे. आपला पत्ता निश्चितपणे कापला जाईल असा स्पष्ट आणि कठोर संदेश दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या मुंबईतील बौध्दिकामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे, फडणवीस व अजितदादा यांना दिला आहे. पण “अब की बार चार सौ पार” हे ध्येय असल्याने पत्ता कापायचा झाल्यास तुल्यबळ क्षमतेचा उमेदवार निवडण्याचे आव्हान भाजप समोर आहे. शिवाय वंचित बहुजनच्या नावाने खडे फोडत महाविकास आघाडीनेही अजून मतदारसंघ आणि उमेदवार यांचा घोळ सुरूच ठेवत कालापव्य य सुरू ठेवल्याने महायुतीच्या पक्षांमध्ये धादकधूक वाढली आहे.
भाजपने सध्या स्वत:च्या पक्षासह आपल्या मित्रपक्षांमध्ये कुणाला कुठे उमेदवारी द्यावी यात लक्ष घातल्याने रामदास कदम यांच्या सारख्या नेत्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखविण्यास सुरूवात केली  आहे. भाजपकडून कदम यांच्या सिध्देश या मुलाला उत्तर पश्चिम मुंबईत ऐंशी वर्षीय वयोवृद्ध खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ऐवजी उमेदवारी देण्याचा कदम यांचा आग्रह असला तरी भाजपने किर्तीकर आणि कदम दोघांना नकार दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून किर्तीकर यांचे सुपूत्र आणि आदित्य ठाकरे यांचे घनिष्ट मित्र अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. बापलेकाच्या नातेसंबंधांचा फटका महायुतीला बसू नये असा विचार शिवसेना – भाजपमध्ये सुरू असल्याचे समजते. मात्र शिवसेनेकडून ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसचे ज्येष्ठ उत्तर भारतीय नेते माजी खासदार संजय निरुपम यांना न सोडल्याने ते प्रचंड नाराज आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवसेना खासदार म्हणून भाजप-

सेना युतीत काम केलेले आहेच. त्यामुळे नाराजीच्या कारणाने भाजपच्या वाटेवर असलेले संजय निरुपम यांना भाजपने येथे उमेदवारी देवू केल्यास उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या आणि निरुपम यांचा व्यक्तिगत संपर्क याचा भाजपला फायदा मिळू शकतो.
मुंबईच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळी गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता असून येथे देखील भाजपला सेलेब्रिटी किंवा मोदी शहा यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या पियुश गोयल यांना विजयी करण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे. तीच बाब इशान्य मुंबईमध्ये मनोज कोटक यांच्या बाबतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते अनुराग ठाकूर, अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह मोहित कंभोज यांच्या नावाची येथे चर्चा असून मनोज कोटक यांच्या जागी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे तसे झाले नाही तर कोटक कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तरमध्य मुंबईत पुनम महाजन यांनाही बदलून त्याच्याजागी नवा चेहरा दिला जाण्याच्या चर्चा आहेत. तर दक्षीण मध्य मुंबईत राहूल शेवाळे याना एकमात्र शिवसेना उमेदवार म्हणून येथे कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड किंवा वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धारावी अदानीच्या विषयावर हा मतदारसंघ गाजण्याची शक्यता आहे, दक्षीण मुंबईत अरविंद सावंत विरोधात राहूल नार्वेकर अशी तगडी फाईट होत असून त्यात नुकतेच शिंदे सोबत गेलेल्या मिलींद देवरा यांनी आपले राजकीय वजन भाजपसाठी खर्च केल्यास भायखळा कुलाबा मलबार हिल याभागातून नार्वेकर यांना बळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात तसेच मुस्लिम मतदारात यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेना असे नवे समिकरण असल्याने वेगळाच सामना रंगण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात नातेसंबंधांचा धोका नको या  सूत्रामुळे रावेरला नाथाभाऊ खडसे यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे विद्यमान खासदार आहेत. जातीच्या समीकरणाशिवाय कुठल्याही पक्षाचे खडसे यांना तोडीस तोड म्हणून गिरिश महाजन यांना किंवा अन्य लेवा पाटील समाजाच्या उमेदवाराचा शोध भाजप घेत आहे. त्यात माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांचे नाव सध्या भाजपकडून आघाडीवर आहे.
राज्याच्या अन्य काही भागात देखील सध्याचे चेहरे बदलून सक्षम उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यात सांगली येथे संजयकाका पाटील , धुळ्यात डॉ सुभाष भामरे, तर गडचिरोली चिमूर मध्ये अशोक नेते  या खासदाराना घरी पाठवून सांगली व धुळ्यात काँग्रेसच्या निष्ठावान डॉ पतंगराव कदम आणि रोहिदास पाटील यांच्या मुलांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रोहिदास पाटील यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील यांच्या संस्थावर अनेक धाडी पडल्या होत्या. या ससेमिऱ्यातून सुटायचे , संस्था वाढवायच्या, वाचवायच्या आणि विकासाच्या नावाने राजकारण करायचे तर सत्ताधारी पक्षाचे बाशिंग बांधावेच लागते हे या घराण्यातील तरुण पिढीने ओळखले आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी यासाठी मोठाच “आदर्श” निर्माण केला असल्याने विश्वजीत कदम व कुणाल पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर गेल्यास आश्चर्य वाटू नये,म्हणजे फोडाफोडी करूनही भाजपला अजून येथे मनासारखा उमेदवार मिळत नाही हे स्पष्ट झाले आहे.

हीच गोष्ट गडचिरोली चिमूर मध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बाबत सागण्यात येत आहे. सध्या त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसे झाले नाही तर स्वत: वडेट्टीवार भाजपमध्ये गडचिरोली चिमूर ची उमेदवारी भाजपकडून मिळवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हीच बाब सोलापूरात कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या बाबत सांगण्यात येत आहे. प्रणती शिंदे यांना सोलापूरात पक्षाने उमेदवारी न दिल्यास त्याच्याकडून भाजपची उमदवारी घेतली जावू शकते. तर कोल्हापूरात शाहू महाराज यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून भाजपकडे उडी घेत सतेज पाटील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉंगेसला विजयाची हमी गँरंटी असलेल्या सहा ते आठ जागांवरील संभाव्य उमेदवार भाजप पळविण्याच्या प्रयत्नात असून मोदी यांची हीच ४५प्लस जिंकण्याची गँरंटी आहे असे सांगण्यात येत आहे. लवकरच हे चित्र स्पष्ट होणार असून घोडमैदान जवळ आहे.

Social Media