MPSC पेपरफुटीवरून रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल; ‘राज्यपालांकडे जबाबदारी ढकलून मोकळे झाले’

MPSC पेपरफुटी प्रकरण : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल; ‘राज्यपालांकडे जबाबदारी ढकलून मोकळे झाले’

पुणे : MPSC कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी व विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्यांविरोधात संविधानाच्या

कलम ३१७ अंतर्गत कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव

वर्मा यांच्याकडे केली आहे. मात्र, या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

आंदोलनस्थळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी या निर्णयाच्या घटनात्मक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ही केवळ धुळफेक आहे, असा घणाघात त्यांनी केला.

MPSC पेपरफुटी प्रकरण : ‘ही केवळ धुळफेक’; रोहित पवारांनी उपस्थित केले घटनात्मक प्रश्न

“द कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट, १९५२ अंतर्गत न्यायालयीन चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे. मात्र,

संवैधानिक पदावर असलेल्या MPSC अध्यक्षांना पदावरून हटवायचे असेल तर मुख्यमंत्री एकट्याने निर्णय घेऊ शकत नाहीत.

मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवावा लागतो. त्यानंतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे संविधानाच्या कलम ३१७

अंतर्गत प्रस्ताव पाठवतात,असा दावा रोहित पवार यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा अधिकार राज्यपालांकडे दिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संविधानाच्या कलम १६३ अंतर्गत

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने प्रस्ताव राज्यपालांकडे देणे अपेक्षित असल्याचे सांगत, मंत्रिमंडळाची बैठक न घेता मुख्यमंत्र्यांनी

स्वतः निर्णय घेतला असेल तर ही प्रक्रिया घटनात्मक कशी, असा प्रश्न त्यांनी विचारला.

MPSC अध्यक्षांना हटवण्याच्या प्रक्रियेवर रोहित पवारांचा दावा

रोहित पवार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री कुठेतरी स्वतःची जबाबदारी राज्यपालांकडे ढकलून मोकळे झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या

रोषाला कसे सामोरे जायचे, त्यावर मार्ग कसा काढायचा आणि मित्राला कसे वाचवायचे, हे मुख्यमंत्र्यांना कळत नाही. त्यामुळे

कुठेतरी असंवैधानिक पद्धतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

आपल्या हातात मुख्यमंत्र्यांचे पत्र आल्यानंतर त्याचा अभ्यास करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सध्या बातम्यांच्या आधारे

बोलत आहोत. पत्र हातात आल्यानंतर आज संध्याकाळी ४० हजार विद्यार्थ्यांसमोर भाषणातून या संपूर्ण विषयाची पोलखोल

केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. यावेळी भाजपा प्रवक्त्यावर भूकणारे असेच भूकत राहतील

त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही अशी टिका नवनाथ बन आणि चित्रा वाघ यांचे नाव न घेता केली.

 

Published by – SanvadMedia

Social Media