फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई १०० टक्के अनलॉक

मुंबई : मुंबई शहरात दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत आहे .त्यामुळे मुंबईत फेब्रुवारी अखेरपर्यंत १०० टक्के अनलॉक(unlock) होणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar) यांनी दिलेत.

“कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर मुंबईनं लसीकरणाच्या साथीनं कोविडवर नियंत्रण मिळवलं आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचं लसीकरण(vaccination) १०० टक्के पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्ण क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात.” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे मुंबईत राजकिय घडामोडींनाही गती येते. या महिन्या अखेरपर्यंत मुंबई पुन्हा एकदा अनलॉकच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या दररेज सरासरी ५०० कोरोना रुग्ण आढळत आहेत.

हा आकडा कोरोनानं मुंबईत थैमान घातलं होतं, त्यावेळपेक्षा बराच कमी आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारीअखेरची कोरोना स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे संकेत महापालिका (Municipal Corporation)प्रशासनानं दिलेत.


महाराष्ट्राच्या भोर तालुक्याने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे नवे मापदंड स्थापित केले

Social Media