मुंबई: कौशल्य विकास(Skill development) प्रशिक्षणाची संधी बालगृहातील प्रवेशितांनाही मिळावी याकरीता माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळेमध्ये (David Sassoon Industrial School)किशोरवयीन मुलांना ज्यूट बॅग मेकिंग व असिस्टंट वायरमन या व्यावसायिक कोर्सेसचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.
मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थिनी बनविलेल्या ज्यूट बॅग्सची(Jute Bags) पाहणी करुन जिल्हाधिकारी राजीव निवतकर (District Collector Rajiv Nivatkar)यांनी मुलांचे कौतुक केले. कौशल्य प्रशिक्षणाची संधी वंचित घटकापर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणाचा या वंचित मुलांना भविष्यात निश्चितच उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण संपन्न झाले. मुलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जन शिक्षण संस्थेच्या संचालिका अरुणा मोहिते, चिल्ड्रेन एड संस्थेचे उपमुख्य अधिकारी सतीश बनसोडे यांनी यांनी नियोजन केले.