Mumbai Cruise Drug Case: हाय प्रोफाईल ड्रग्स पार्टीवर छापा, शाहरुखच्या मुलासह 8 जणांची चौकशी

मुंबई :सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून चौकशी केली जात आहे. एनसीबीच्या टीमने शनिवारी रात्री मुंबईतील क्रूझवर छापा टाकला. एनसीबी आणखी 8 लोकांची चौकशी करत आहे. या सर्व लोकांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेतले जातील.

शनिवारी रात्री माध्यमांमध्ये ही बातमी येताच सर्वत्र खळबळ उडाली की बॉलिवूडचा तो सुपरस्टार कोण आहे, ज्याच्या मुलाला एनसीबीने मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी नेले आहे. रविवारी सकाळी एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट झाले की तो दुसरा कोणी नसून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे.

या लोकांची चौकशी केली जात आहे

These people are being questioned

  1. आर्यन खान

2. नुपूर सारिका

3. इस्मीत सिंग

4. मोहक जसवाल

5. विक्रांत छोकर

6. गोमित चोप्रा

7. मुनमुन धमेचा

8.अरबाज मर्चेंट

आर्यन खान काही महिन्यांपूर्वी शिक्षण पूर्ण करून भारतात परतला आहे. आर्यन सोशल मीडियावर फार सक्रिय नाही पण गेल्या काही तासांत त्याने ट्विटरवर ट्रेड गाजवले आहे. यासंदर्भात इंटरनेटवर मीम्स खूप व्हायरल होत आहेत. काही लोक क्रूझ पार्टीच्या फोटोंची मागणी करत आहेत.

मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांच्यासह आठ जणांना मुंबईतील एका रेव्ह पार्टीच्या छाप्याप्रकरणी अटक करण्यात आली असून चौकशी केली जात आहे.

Superstar Shah Rukh Khan’s son Aryan Khan is being questioned by the Narcotics Control Bureau (NCB) in the Mumbai cruise drugs case. The NCB team raided a cruise in Mumbai on Saturday night. NCB is interrogating 8 more people. The statements of all these people have been recorded and blood samples will also be taken.


‘गंगूबाई काठियावाडी’ 2022 मध्ये होणार प्रदर्शित –

आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ 2022 मध्ये होणार प्रदर्शित

Social Media