नवी मुंबई : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन(International airport) लवकरच विमानांचे उड्डान होणार आहे. ५ ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या(Mumbai International Airport) धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते अन् सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी दिली.
आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केला. त्यावेळी ते म्हणाले, ५ तारखेपर्यंत एअरफोर्सचे एक विमान रन वे वर ट्रायल करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे. या विमानतळावर ४ टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास ३५० विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो.
नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेन(Bullet train)ची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड(Raigad) जिल्ह्यात उलवा आणि पनवेल दरम्यान १६०० हेक्टर जमिनीवर तयार होत आहे. त्यासाठी सिडको नोडेल एजन्सी म्हणून काम करत आहे. १९ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे. हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रॉजेक्ट ५ टप्प्यात पूर्ण होणार आहे. सिडकोचे निर्देशक विजय सिंघल आणि संयुक्त प्रबंध निदेशक शांतनु गोयल या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर लक्ष ठेवत आहेत.