ईशान्य (उत्तर पूर्व) मुंबई लोकसभा मतदार संघ 

मुंबईच्या लोकसभा (Mumbai Lok Sabha)निवडणुकीत नेहमीच महत्वाचा ठरलेला ईशान्य मुंबई,(North East (North East) Mumbai )म्हणजे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, कधीकाळी मराठी (Marathi)मतदारांचा दबदबा असलेला मतदारसंघ होता. मात्र आता वाढती लोकसंख्या (Growing population)आणि विस्थापनामुळे येथे बहुभाषिकांची टक्केवारी वाढली आहे. मध्यरेल्वेच्या मार्गावरचा मुलूंड(Mulund), भांडूप(Bhandup), विक्रोळी(Vikhroli ) घाटकोपर पूर्व(Ghatkopar East) आणि पश्चिम तसेच मानखुर्द असा सहा विधानसभा मतदारसंघाचा भाग या लोकसभेत येतो. त्यापैकी चार मतदारसंघात भाजप अेकात शिवसेना ठाकरे (Shiv Sena Thackeray)तर एक सपा अशी राजकीय स्थिती आहे.(Mumbai Lok Sabha ELECTION2024)

कधीकाळी भाजप(BJP) सेनेचा हमखास मतदारसंघ असल्याने सुब्रमण्यम स्वामी, जयवंतीबेन मेहता, प्रमोद महाजन अश्या बड्या नेत्यांना येथून नशिब अजमावण्याचा इतिहास असताना किरिट सोमैय्या संजय दिना पाटील आणि गुरूदास कामत या स्थानीक नेत्यांनी देखील या भागाचे नेतृत्व केले आहे. ख-या अर्थाने मुंबईचा एन्ट्री पॉइंट असलेल्या या मतदारसंघातूनच दोन्ही टोकातून नाशिक आणि पुणे कडे जाणारे मार्ग जातात. मानखुर्द, नवीमुंबई मार्गे फ्री वे जातो पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्यांना या मार्गाने मुंबईत प्रवेश मिळतो, तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा येथून येताना मुलूंड चेकनाका पार करून मुंबईत यावे लागते. त्यामुळे हा मतदारसंघ मोक्याचा आणि राजकीय दृष्ट्या धोक्याचा ठरतो. यावेळी तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे मतदारसंघालगतच्या या भागात विकास कामांचा स्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याने राजकीय महत्व वाढले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी शिवसेनेला येथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुलूख मैदान नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील येथील भांडूप येथे आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी खासदार तसेच माजी मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील सध्या शिवसेना ठाकरे गटात गेल्याने ते येथे उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपचे बिगजायंट नेते किरिट सोमैय्या देखील याच मतदारसंघात तीन वेळा आमदार आणि खासदार राहिले आहेत. मनसे शिवसेना यांच्यात मराठी मतांची विभागणी झाल्यानंतर आता शिंदे ठाकरे अशी फोड झाल्याने तसेच भाजप शिवसेना अशी फारकत झाल्यानंतर पहिल्यांदा होणा-या या मतदारसंघात आता राष्ट्रवादी शिवसेना कॉंग्रेस असे, नवे समिकरण तयार झाले आहे. कॉंग्रेसचे माजी मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा याच भागातून येतात, त्यांच्या शिख समाजाचे गुरूव्दारा असल्याने पवई भांडूप घाटकोपर मानखुर्द या भागात ब-या प्रमाणात वास्तव्य आहे. तर भाजपचे सरदार तारासिंग अनेक वर्ष येथे आमदार राहिले आहेत. मात्र मराठी मतांची विभागणी यावेळी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असून मनसेचे नेते शिशिर शिंदे लढल्यास ईशान्य मुंबईचा गड महाविकासआघाडीसाठी राखणे कठीण होईल, असेच चित्र सध्यातरी दिसते.

महापालिका निवडणुका(Municipal elections) दोन वर्षापासून रखडल्याने या भागात नागरी समस्यांचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई विकास प्राधिकरणाच्या मोनो मेट्रो प्रकल्पांच्या कामांसह रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, वाहतूक, शिक्षण या सारख्या समस्यां मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्य़ा (Slums)असलेल्या या भागात आहेत. नव्याने विकास होत असलेल्या भागात मराठी टक्का कमी होत असून विकास नियंत्रण नियमावली आणि खारजमिनींचा मोठा प्रश्न आहे. धारावी विकास योजनेतून विस्थापीत होणाऱ्यांना याच खार जमिनीवर वसविण्यात येत असल्याने भविष्यात नागरी समस्या वाढण्याची शक्यता आहे.

राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीचे  संजय दिना पाटील(Sanjay Dina Patil) सध्या, शिवसेनेत आले आहेत तर  : शिशिर शिंदे(Shishir Shinde) यांनी शिवसेना सोडून शिंदे गटाचा हात धरला आहे. भाजपचे किरिट सोमैय्या यांचा दबदबा कमी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडून मनोज कोटक(Manoj Kotak), मिहिर कोटेचा(Mihir Kotecha) यांना बळ दिले जात असल्याने तसेच प्रकाश मेहता राम कदम अश्या अन्य नेत्यांचेही या भागात प्रस्थ असल्याने भाजप गटागटात विभागली गेली आहे. मानखुर्द(Mankhurd) घाटकोपर (Ghatkopar)रमाबाई नगर सारख्या भागात दलित मतांचे एकगठ्ठा पॉकेट तर मानखुर्द भागात मुस्लिम, उत्तर भारतीय दक्षीण भारतीयांचा तसेच बांगलादेशी नागरीकाचा भराणा आहे. त्यामुळे मविआने नीट प्रचार केला तर त्यांना शिवसेनेची साथ नसलेल्या भाजपच्या उमेदवारावर विजय मिळवणे शक्य होण्याची शक्यता आहे. मिठागरांच्या जागांचा विकास रखडला, नाहूर ते मुलुंड अंतर्गत रस्त्यांबाबत दुर्लक्ष, रमाबाई आंबेडकरनगर आणि मानखुर्द शिवाजीनगर झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, मानखुर्दमधील मुस्लिम कब्रस्तानचा प्रलंबित प्रश्‍न, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न असे अनेक वर्ष रेंगाऴलेले प्रश्न येथे कायम आहेत. भाजपकडून यावेळी मिहिर कोटेचा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर मनोज कोटक यांचा पत्ता कट झाला आहे, त्याशिवाय पराग शहा, राम कदम यांच्या घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघाचा अपवाद केल्यास कोटेचा यांना त्यांच्या मुलूंड येथे भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे गुजराती मतदारांचा कितपत प्रतिसाद मिळेल ते पहावे लागेल. उत्तर भारतीय आणि शिख मतदार त्यांना संमिश्र मतदान करण्याची शक्यता आहे. मात्र कॉंग्रेस (Congress)शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादीने नियोजन केल्यास हा किल्ला त्यांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे.

 

किशोर आपटे

ज्येष्ठ पत्रकार, मुंबई

 

Social Media