मुंबई : मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एक ही उमेदवार निवडुन आला नाही या लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी आगामी सन 2022 मुंबई महापालिकेच्या(Mumbai Municipal Corporation) निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी आताच वॉर्ड निश्चित करून तयारीला लागा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले.एम आय जी क्लब येथे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी साठी रिपाइं च्या मोजक्या आणि महत्वपुर्ण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यात ना. रामदास आठवले यांनी मुंबई मनपा निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि रणनीती ठरविण्याबाबत चर्चा केली.
मुंबई मनपा निवडणूक
आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना;राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आव्हान उभे करेल त्यांच्या विरुद्ध भाजप आणि आरपीआय युती करून लढेल.भाजपचा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर करण्यासाठी भाजप बरोबर आरपीआय चे ही उमेदवार निवडून आणणे आवश्यक आहे. आपापले वॉर्ड निश्चित करुन आता पासून कार्यकर्त्यांनी निवडणुकी ची तयारी करावी.एकनिष्ठता आणि ज्येष्ठता यांचा पक्षात सन्मान होईल मात्र प्रत्येक ठिकाणी उमेदवारी देताना केवळ जिंकून येण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल. जुन्या ज्येष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच नव्या कार्यकर्त्याना ; विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना ही रिपाइं ची उमेदवारी दिली जाईल. त्यात बौद्ध मातंग ;मुस्लिम; मराठा;हिंदी भाषिक; गुजराती ;तामीळ; कन्नड भाषिक अशा सर्वांना रिपाइं तर्फे उमेदवारी दिली जाईल अशी घोषणा यावेळी ना रामदास आठवले यांनी केली. मुंबई मनपा निवडणुकीत भाजपशी युती करताना रिपब्लिकन पक्षाला मुंबईत तालुका निहाय एक जागा याप्रमाणे किमान 35 जागा मिळाव्यात असा प्रस्ताव देणार असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी यावेळी दिली.
आगामी मुंबई महापालिका(Mumbai Municipal Corporation) निवडणूक जिंकण्याची पूर्वतयारी
आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याच्या पूर्वतयारीसाठी तालुका निहाय मेळावे आयोजित करावेत त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आयोजित करावेत ; तालुका आणि जिल्हा निरीक्षक नियुक्त करावेत.असे निर्देश ना.रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिले.
मुंबई मनपा निवडणुकीत अनुसूचित जाती आणि जमाती साठी योग्य प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. अनुसूचित जाती जमाती च्या प्रमाणात आरक्षण ठेवल्यास राखीव मतदारसंघाची संख्या वाढू शकते त्यासाठी न्यायालयात जाण्याचा आपला विचार असल्याचे रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी संगितले.
या बैठकीत मुंबईत संघटनात्मक बांधणी करताना मतदार यादी नुसार बूथ प्रमुख निवडण्याची सूचना रिपाइं चे युवक आघाडी चे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली.तर भाजपच्या कमळ चिन्हावर रिपाइं कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची सूचना ज्येष्ठ नेते चंद्रकांत कसबे यांनी केली.या बैठकीला माजी आमदार सुमंत राव गायकवाड; पप्पू कागदे;सुरेश बारशिंग आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारी साठी वर्षभर आधीच रिपाइं च्या मुंबई प्रदेश तर्फे तयारी सुरू केल्याबद्दल सर्वांनी रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांचे अभिनंदन केले.मुंबई मनपा निवडणुकी च्या तयारी साठी एम आय जी क्लब मध्ये घेण्यात आलेली ही दुसरी बैठक होती या आधी जानेवारी मध्ये सांताक्रूझ येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात रिपाइं मुंबई प्रदेश ची बैठक घेऊन मनपा निकडणुकी बाबत चर्चा करण्यात आली होती.