मुंबई पोलिसांनी बप्पी लहरींना अनोख्या अंदाजात वाहिली आदरांजली..!

मुंबई : प्रख्यात गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आज वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.  राजकीय नेते तसेच अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी डिस्को किंग बप्पी लाहिरी यांच्याबद्दल शोक व्यक्त केला.

बप्पी लाहिरी यांना  मुंबई पोलिसांनीही ट्विटरवर अनोख्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये बप्पी लाहिरीचे प्रसिद्ध गाणे “यार बिना चैन कहा रे” असे लिहिले आहे.  यात सोन्याची चैन दाखवली आहे. बप्पी लहरींचे सोन्याच्या दागिन्यांवरचे प्रेम दाखवण्यासाठी  या चित्राचा वापर केला.

या पोस्टला कॅप्शनमध्ये बप्पी दी, प्यार कभी कम नहीं होगा.., असे म्हटले आहे. मुंबई पोलीस आपल्या आगळ्यावेगळ्या ट्रेडिंग पोस्टसाठी ओळखले  जातात.  बप्पी लहरी यांना त्यांचे चाहते प्रेमाने बप्पीदा म्हणतात.

बप्पी लाहिरी यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अपरेश लाहिरी आणि आईचे नाव बन्सरी लाहिरी होते.

लाहिरी यांनी वयाच्या तीन वर्षापासून तबला वाजवण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना आणखी युक्त्या शिकवल्या. बॉलिवूडमध्ये रॉक आणि डिस्कोची ओळख करून देणारे आणि संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचवणारे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Social Media