पालिकेचा शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प : यंदाचा अर्थसंकल्प ३,३७० कोटींचा, टॅब, व्हर्च्युअल ट्रेनिंगसाठी मोठी तरतूद

मुंबई : मुंबई  महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा  अर्थसंकल्प  ३ हजार ३७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २०२२-२३ आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी तर उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजे २७१०.७७ कोटी आहे
मुंबई  महापालिकेचा २०२२- २०२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला . शिक्षण विभागासाठी यंदा एकूण २८७०.२४ कोटींची तरतूद करण्यात आली असून  भांडवली कामांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन झाल्याचे पडसाद या अर्थसंकल्पावर दिसून आले. पालिका शाळांच्या वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांच्या २,५१४ वर्ग खोल्या डिजीटल होणार आहेत.Municipal Education Department budget

ठळक वैशिष्ठे –    विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब देण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे

शाळांमधील आगीचे प्रकार रोखण्यासाठी पालिका अग्निशामक साहित्य उपकरणांची खरेदी करणार आहे

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब देण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे

शाळांमधील आगीचे प्रकार रोखण्यासाठी पालिका अग्निशामक साहित्य उपकरणांची खरेदी करणार आहे .

महानगरपालिकेच्या सर्व शालेय इमारती करिता अग्निशमन को पुरविण्यात आले आहेत. मात्र सद्या बाजारात सुलभ व सुरक्षित अशी ५०० मि.लि. ची जेटकुल जेल अग्निशमक यंत्रे उपलब्ध असून त्याद्वारे आग जलदगतीने विझवली जाऊन झटपट कूलींग होते.

बर्निंग तापमान १००० से. असले तरीही ते ३० से. पर्यंत कमी केले जावू शकते.

सदर यंत्र वापरास सुलभ व सोपे असल्याने याचा उपयोग विद्यार्थी देखील करु शकतील.

महानगरपालिका शाळांमधील वर्ग खोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळ कार्यालय इ. ठिकाणी वापर करण्यासाठी काही ठराविक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर जेटकुल जेल अग्निशमक यंत्रे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या शिफारशी नंतर खरेदी करण्यात येणार आहेत.

कौशल्य प्रशिक्षणासाठी १.४० कोटी

शिक्षण विभागांच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी १ कोटींची तरतूद

केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएसई शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणीसाठी 15 कोटींची तरतूद

माध्यमिक शाळांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य 28 लाख

10 हजार पोलिमार डेस्क बेंच 3 कोटी 29 लाख

खासगी शाळांना अनुदान – 414.37 कोटी

ग्रंथ संग्रहालयांना अनुदान – 1 कोटी

बालवाडी वर्गाना अनुदान- 9.05 कोटी

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी 2.37 कोटी रुपयांची तरतूद

मुलींना उपस्थिती भत्त्यासाठी 54 कोटी रुपयांची तरतूद

आय.जी.सी.एस.ई. ( International General Certificate of Secondary Education) व आय. बी (International Baccalaureate) शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करणार

टॉय लायब्ररीमुळे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

ऑलिंपियाड परीक्षांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद

चित्रकला स्पर्धांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद

संगीत अकादमीसाठी 14 लाख रुपयांची तरतूद

कार्यानुभव ऑनलाईन शिक्षणासाठी 19 लाख रुपयांची तरतूद

आधुनिक शिक्षण , व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरसाठी 26 .25 + 11.77 कोटींंची  तरतूद

विचारशील प्रयोगशाळांसाठी 29 लाख रुपयांची तरतूद

प्रशिक्षण व उपक्रमांसाठी 16 लाख रूपयांची तरतूद

स्काऊट व गाईड विभाग -: 82 लाख रुपये

जिल्हा प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित प्रशिक्षण 9 लाख रुपये

शालेय इमारती दुरुस्ती ४१९.२० कोटी तरतूद

संगणकीय प्रयोगशाळा अद्यावतीकरण -: 11.20 कोटी रुपये

शाळा व्यवस्थापन माहिती यंत्रणा 57 लाख

शाळांमध्ये हाऊसकिपिंग – ७५ कोटी

शिक्षक महापौर पुरस्कार -14 लाख रुपये

विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा -7 कोटी रुपये

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य – 100 कोटी रुपये

विद्यार्थ्यांना खगोलीय घडामोडीचे ज्ञान व त्या विषयातील जिज्ञासा वृत्ती वाढवण्याकरता महापालिकेच्या शाळांमध्ये 25 खगोलीय प्रयोगशाळा प्रायोगिक तत्त्वावर स्थापन करणार

शॉर्ट शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कौशल्य विकास प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 1. 40 कोटी

कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक साधनांचा पुरवठा करणार

१) 2021-22 शैक्षणिक वर्षामध्ये पालिकाचे सर्व शाळांमध्ये मिळून 26 हजार 449 इतकी विद्यार्थ्यांची वाढ झाली.

२) मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना गुरुवारी सकाळी १०.१८ वाजता सादर केला.

३) 2021-22 आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 2701.77 कोटी एवढी असून, 2022-23 आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 2870.24 कोटी प्रस्तावित करण्यात आलेत.

४) शिक्षण खात्याचा यंदाचा अर्थसंकल्प ३३७०.२४ कोटींचा आहे

५) महसुली खर्च २८७०.२४ कोटी रुपये

Social Media