58 वर्षीय महिलेच्या हत्येमागचे गूढ उकलले, पोळी-भाजी सेंटर चालवणाऱ्या महिलेला अटक

मुंबई : डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकातील आनंद शिला भवन येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय विजया बाविस्कर या रात्री घरात एकट्या असताना गळा आवळून खून करण्यात आला. २४ तासांत मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र या गुन्ह्यात आणखी कोणी आरोपी आहे का? हा गुन्हा मालमत्तेच्या वादातून झाला आहे की नाही? अन्य बाबींचाही पोलिस तपास सुरू आहे.

40 वर्षीय सीमा सुरेश खोपडे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. तपास डोंबिवली विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सपोनि वैभव चुंबळे, सपोनि प्रवीण बाकले, फौजदार अजिंक्य धोंडे, फौजदार ममता मुंजाळ, सपोनि अविनाश वनवे, फौजदार सुनील मोरे, फौजदार सुनील मोरे, फौजदार सुनील मोरे, सपोनि प्रवीण बाकळे यांनी सुरू केला.

पथकांनी खाजगी गुप्तहेरांकडून तांत्रिक विश्लेषण आणि माहिती मिळवली. त्याचबरोबर झोपडपट्टीत शोधमोहीम राबवून सीमा सुरेश खोपडे (४०) हिला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिसांनी तिला अटक केली.

सीमा खोपडे आणि विजया बाविस्कर या जुन्या ओळखीच्या होत्या सीमा रविवारी रात्री झोपण्याच्या उद्देशाने विजया यांच्या घरी आल्या होत्या. तिथे त्यांची नियत बदलली आणि तिने विजयाचा गळा दाबून खून केला. नंतर तिने विजया यांच्याकडून एक नेकलेस,  कानातले, एक अंगठी आणि दोन बांगड्यांसह सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात आणखी कोणी आरोपी आहे का? किंवा मालमत्तेच्या वादामुळे गुन्हा आहे की कसा? पोलीस अधिक तपास करत आहेत.

Social Media