नागपुरात आज आणि उद्या जनता कर्फ्यूला सुरुवात,अनेक दुकाने बंद,रस्त्यावर काही प्रमाणात शुकशुकाट,नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद

नागपूर : नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता आज आणि उद्या नागपुर शहरात जनता कर्फ्यू चे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनी नागपुरकरांना जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आज जनता कर्फ्यू चा पहिला दिवस असून आज सकाळ पासुनच नागपुरच्या रस्त्यावर जनता कर्फ्यु ला अल्प प्रतिसाद बघायला मिळाले.अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर शासकीय, खाजगी कार्यालयाचे कर्मचारी,पोलिस विभाग,आरोग्य कर्मचारी सह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसून येत आहे.

शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांतर्फे बंद ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडल्यास इतर सर्व आस्थापने नागरिकांतर्फे बंद ठेवण्यात आले आहे. शहरात जनता कर्फ्यू ला नागरीक चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसत असले तरी काही परिसरात जनता कर्फ्यू ला मोडून नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. हा जनता कर्फ्यू उद्या म्हणजे रविवारी  सुद्धा राहणार आहे. याशिवाय 30 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी जनतेला केले आहे. दुसरीकडे मात्र जनता कर्फ्यू बाबत महापालिके तर्फे कोणताही अधिकृत आदेश काढण्यात आला नसून नागरिकांनी स्वछेने सहभागी होऊ शकता, विनाकारण कुणीही घराबाहेर फिरू नये असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले आहे.

नागपूर चे महापौर संदीप जोशी आणि माजी मंत्री तसेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्त्यावर उतरून जनतेला जनता कर्फ्यु पाळण्या चे आवाहन केले आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यु पाळावा आणि कोरोना पासून स्वतःचे आणि परिवाराचे संरक्षण करावे असे आवाहनही यावेळी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Social Media