नागपूरसह विदर्भात थंडीची लाट कायम

नागपूर : नागपूर सह विदर्भातील थंडीची लाट कायम असून गोंदिया नंतर नागपूर विदर्भात सर्वाधिक थंड शहर ठरले आहे. नागपूरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याने नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत, घराघरात एअर हिटर लागले आहेत.

नागपूर सह संपूर्ण विदर्भात थंडीची लाट कायम असून नागपूरात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे . नागपूर चे तापमान 7.6 अंश सेल्शियस नोंदविले गेले तर गोंदीयात 7.4 अंश सेल्शियस तापमान होते . यामुळे नागपूर शहर गोंदिया नंतर विदर्भातील सर्वात थंड शहर ठरले . कडाक्याच्या थंडी पासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत असून रात्रीला ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत, तर अनेकांनी घराचा आतमध्ये एअर हिटर लावले असून नागरिक थंडी पासून स्वतःचा बचाव करीत असल्याचे दिसत आहे, कडाक्याच्या थंडी मुळे सर्दी, खोकला , तापेचे रुग्ण घरोघरी बघायला मिळत आहे, नागरिकांनी थंडी पासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन शहरातील डॉक्टरांनी केले आहे

Social Media