धर्माच्या नावावर देश तोडण्याचा प्रयत्न सफल होणार नाही ! : नाना पटोले

मुंबई : देशात मागील काही वर्षांत धर्मा धर्मात फूट पाडून देश तोडण्याचे काम धर्मांध शक्ती प्रयत्न करत आहेत. हा देश हिंदू मुस्लीम शिख ईसाई सर्व धर्मियांचा आहे. ज्या विभाजनवादी शक्ति द्वेषाचे विष पेरून देशात फूट पाडू पहात आहेत त्यात ते सफल होणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी म्हटले आहे.

इस्लाम जिमखाना येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती, यावेळी सर्व धर्माचे धर्मगुरू तसेच इराक, इराण अफगाणिस्तान, येमेन या देशांच्या राजदूतांसह विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. वजाहत मिर्झा, आ. अमीन पटेल, अमर राजूरकर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, अमिन पटेल, माजी खासदार संजय निरुपम, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. अमरजित सिंह मनहास, आ. वजाहत मिर्झा, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, AICC चे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजन भोसले, झीशान अहमद, युसुफ अब्राहिमी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आज देशात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात असताना आजची ही इफ्तार पार्टी सर्वधर्मसमभावचा संदेश देणारी आहे. धर्मा धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करणा-यांना आजची इफ्तार पार्टी ख-या भारताचे प्रतिनिधित्व करणारी आहे. देश सर्वांच्या संघर्षाने व अनेक स्वातंत्र्यसोनिकांच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला. देशात सर्व धर्माचे लोक रहात आहेत पण त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काही पक्ष व संघटना करत आहेत त्यांना लोक धडा शिकवतील असे सांगून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.


एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी आ. सदाभाऊ खोत व आ. पडळकरांचीही चौकशी करा!: अतुल लोंढे

Social Media