आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) सोलापूर (Solapur)येथील देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मोदी सोलापूर(Solapur) येथे दाखल होणार आहेत. यावेळी सोलापूर येथील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या हस्ते पार पडणार आहे.
यापुढे सोलापूर(Solapur) हे शहर कामगारांची ओळख होईल. सूतगिरणीमध्ये (Cotton mills)काम करणारे कामगार वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम यासह विविध क्षेत्रात हजारो सोलापुरमध्ये काम करत आहे. मात्र त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण आता झोपडपट्टीत राहून हाल सहन करणाऱ्या कामगारांना आता स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या कामगार वसाहतीचे वैशिष्ट्ये :
आज उदघाटन होणाऱ्या कामगार वसाहत ही 350 एकर परिसरात बांधण्यात आली आहे. तसेच या जागेत तब्बल 834 इमारती उभारण्यात आल्या आहे. तर या इमारतीत 30 हजार फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. एकंदरीत या गृहविकास प्रकल्पामध्ये सुमारे 30 हजार कामगारांना स्वतःच हक्काचं घर मिळणार असल्याचं दिसत आहे.