मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो?

National Education Day : 11 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन(National Education Day) साजरा केला जातो. हा दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद(Maulana Abul Kalam Azad) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.11 नोव्हेंबर 2008 रोजी या दिवसाची सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम शिक्षण मंत्रालयाकडून निश्चित केली जाते. जे बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात नव्या सुरुवातीचे द्योतक आहे. यावर्षी 2023 च्या राष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम ‘शाश्वत भविष्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण’ अशी ठेवण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षण दिनी काय केले जाते(National Education Day)

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad)यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. या दिवशी, भारतीय शिक्षण व्यवस्थेचा इतिहास आणि त्याच्या सध्याच्या गरजा याबद्दल अत्यंत गंभीर गोष्टींवर चर्चा केली जाते.या दिवशी शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणाचे महत्त्व आणि त्याच्या विविध पैलूंवर चर्चा करतात. प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष पद्धतीने साजरा केला जातो. या निमित्ताने मौलाना अबुल कलाम यांच्या योगदानाचे स्मरण केले जाते. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थी भाषणेही करतात.

मौलाना अबुल कलाम आझाद कोण होते?(Maulana Abul Kalam Azad)

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबियातील मक्का शहरात झाला. त्यांचे मूळ नाव मुहिउद्दीन अहमद होते. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण वडिलांकडून घेतले. त्यानंतर मौलाना आझाद यांनी इजिप्तमधील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत जामिया अझहरमध्ये प्रवेश घेतला.

मौलाना आझाद यांना अनेक भाषांचे ज्ञान होते. उर्दू, फारसी, हिंदी, अरबी आणि इंग्रजी भाषेत ते पारंगत होते. मौलाना आझाद यांनी सौदी अरेबिया सोडून भारतात आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यावर ते कलकत्त्यात राहू लागले. कलकत्त्यामध्ये राहून त्यांनी पत्रकारिता आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपले पाय रोवले.

मौलाना आझाद यांचे राष्ट्रीय चळवळीतील योगदान(Maulana Abul Kalam Azad)

मौलाना आझाद यांनी 1905 मध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करून राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या फुटीरतावादी विचारसरणीचे खंडन केले. कलकत्त्याहून त्यांनी १९१२ मध्ये अलबलाग नावाचे साप्ताहिक सुरू केले.त्याची एकूण प्रकाशित पानांची संख्या सुमारे 52 हजार आहे. या मासिकात त्यांनी इंग्रजांच्या धोरणांविरुद्ध लेख छापले. याशिवाय मौलान आझाद हे असहकार आंदोलन, खिलाफत आंदोलन, भारत छोडो आंदोलन यासह अनेक राष्ट्रीय चळवळींचा महत्त्वाचा भाग होते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ते सर्वात मोठे पुरस्कर्ते होते.

Social Media