नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय…महाविकास आघाडीच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणला…

मुंबई : नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.

महाविकास आघाडीच्या युवक, महिलांनी मोदी भाजप आणि ईडीच्या नावाने घातला शिमगा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बेकायदेशीर अटक केल्यानंतर राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच संताप आज समोर आला. नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी व मोदी सरकारचा व त्यांच्या केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील मविआचे कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमा झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते, मंत्री आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊन मोदी व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. युवकांनीही मोदी व ईडीच्या नावाने शिमगा घातला.

 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक,सलील देशमुख,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, खनिज व बंदरमंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खासदार हुसेन दालवाई, माजी मंत्री नसीम खान, युवराज मोहिते, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर,उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार सुनील राऊत, आमदार मनिषा कायंदे, उपनेते सचिन अहिर, आमदार यामिनी जाधव, आमदार योगेश कदम, माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अशोक पवार, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार संजय जगताप, आमदार संजय दौंड, आमदार चेतन तुपे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अजय चौधरी, आमदार सुनिल शिंदे, आमदार सुनिल अण्णा टिंगरे, आमदार कारेमोरे, आमदार चंद्रीकापुरे, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार हेमंत टकले,माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ,आमदार संजय पोतनीस, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार अमर राजोरकर,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, युवक, युवती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Media