घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन

मुंबई : केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज व उद्या राज्यभर आंदोलन पुकारले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

तुमचे सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे. सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र व राज्यसरकारसमोर मांडला पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

गृहिणींच्या बजेटमध्ये फार मोठं संकट केंद्रसरकारने निर्माण केले आहे. अचानकपणे सिलेंडरचे दर २५ रुपयांनी वाढवले. २० दिवसाला ८०९ रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत. याचा निषेध करताना जयंत पाटील यांनी आज व उद्या राज्यातील जिल्हयात व तालुक्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जगावं की मरावं हा प्रश्न हेम्लेटच्या नाटकात विचारला होता. मोदींच्या केंद्रसरकारने महागाईने व इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून टाकले आहे. जगावं की मरावं या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’ मध्ये दिसते त्यावेळी ते ‘मरावंच’ असं दिसतं असेही जयंत पाटील म्हणाले.

NCP state president and water resources minister Jayant Patil informed that ncp has called for agitation across the state today and tomorrow against the increased domestic gas, fuel price hike and inflation by the Central government.



माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी –

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी

कोरोना काळातील आंदोलने सरकार का रोखू शकत नाही, उच्च न्यायालयाचे खडे बोल –

कोरोना काळातील आंदोलने सरकार का रोखू शकत नाही, उच्च न्यायालयाचे खडे बोल

Social Media