पंतप्रधान मोदी एकटे करोनाशी लढू शकत नाहीत केंद्र सरकारने करोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी : राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ता नबाब मलिक

मुंबई : केंद्र सरकारने करोनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ता नबाब मलिक (Nawab Malik )यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आवश्यकता आहे.  कारण ते एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असे मलिक म्हणाले.

केंद्र सरकार हात झटकत आहे(The Central Government is shaking hands)

नवाब मलिक पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आता यापूर्वी विरोधक जे बोलत होते, तेच बोलत आहेत. देशात ऑक्सिजन (oxygen)आणि रेमडेसिवीरचा(remdecivir) देखील तुडवडा भासत आहे. मोदीकडे याचे नियोजन नाही. आधी स्वत:कडे अधिकार घेतले आणि आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्र सरकार हात झटकत आहे. देशातील परिस्थिती पाहता आता सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घेण्याची गरज आहे, एकटे मोदी कोरोनाशी लढू शकत नाही, असे मलिक म्हणाले.


गेल्या केवळ चार महिन्यात ५२ हजार १६९ बेरोजगारांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून रोजगार : नवाब मलिक यांची माहिती – SanvadMedia ८ हजार २५९ उमेदवारांना नोकरी


बाधितांची संख्या १० लाखपर्यंत(Number of affected up to 10 lakh)

ते म्हणाले की, रॅपिड अँटीजन टेस्ट (Rapid Antigen Test)केल्यावर करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर जात असल्याचे दिसते. जर आरटीपीसीआर चाचण्या केल्या तर परिस्थिती बिकट होईल. चाचण्या केल्यास बाधितांची संख्या १० लाखपर्यंत जाऊ शकते. लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मलिक म्हणाले. ही परिस्थिती लक्षात घेत सर्व देशातील नेत्यांची बैठक मोदींनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी अशी माझी मागणी आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी परदेशातून सामान येत आहे. परंतु, त्याचे वाटप होत नाही. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, असे सांगताना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

देशात मोदीं विरोधात वातावरण(Atmosphere against Modi in the country)

पश्चिम बंगालमध्ये भाजपची हार झाल्यानंतर देशात मोदींविरोधात वातावरण तयार होत आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप ममतादीदींची बदनामी करत आहे. त्यांच्याबाबत फेक चित्रफिती टाकल्या जात आहे. बंगालमधील हिंसेचे कोणी समर्थन करत नाही, मात्र अशी बदनामी करणे गैर असल्याचे ते म्हणाले. किसान सन्मान निधी आणि मोफत कोरोना लशीची घोषणा भाजपने केली होती. आता भाजपने हे आश्वासन पाळले पाहिजे असेही मलिक पुढे म्हणाले.

NCP national spokesperson Nawab Malik has opined that the Central government needs to convene an all party meeting on corona. Prime Minister Narendra Modi needs to convene an all-party meeting to get out of the crisis of corona.  Malik said he could not fight Corona alone.

Social Media