संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का ; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास तसेच अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष  रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, नगरसेविका, मध्य विधानसभा अध्यक्ष महिला मोर्चा आशाताई विजय निकाळजे, शहर सचिव अंकुश जाधव, युवक पूर्व विधानसभा अध्यक्ष तुषार अहेर पाटील, उपाध्यक्ष सुरेश अहेर पाटील, माजी नगरसेवक सुभाष परदेशी, मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी, शहर अध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग अस्लम शरीफ यांच्या समावेश आहे.

यावेळी संभाजीनगर भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, बापू घडामोडे, बसवराज मंगरूळे, दिलीप थोरात, भाई मुंडे उपस्थित होते.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *