नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह अडकणार विवाह बंधनात!?

मुंबई  : गायिका नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे  दोघेही 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्नाची नोंदणी करणार असल्याची. त्यानंतर, 24 ऑक्टोबरला हे दोघे प्रथा परंपरेनुसार विवाह बांधनात अडकणार आहेत आणि हा सोहळा भव्य स्तरावर होणार असल्याची माहिती आहे.

माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, “लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. हे दोघे 24 ऑक्टोबरला दिल्लीत विवाहबंधनात अडकणार आहेत. ते भव्य स्तरावर असेल. आधीच प्रत्येकाला आमंत्रण पाठवले गेले आहे. मात्र, हे जोडपे 22 ऑक्टोबरला लग्नाची नोंद करतील. या सोहळ्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्रच सहभागी होणार असल्याचीही माहिती आहे.”

रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कड़ यांचा पहिला प्रोजेक्ट ‘नेहू द व्याह’  21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. या गाण्यात दोघेही एका लग्नाच्या अवतारात दिसले आहेत. या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करुन आपल्या रिलेशनशिप स्टेटसची पुष्टी केली होती. या दोघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

Social Media