कोरोना काळात ‘बीएसई’चा नवीन विक्रम; बाजार भांडवल ३ ट्रिलियनच्या पुढे..

नवी दिल्ली : देशातील कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांपासून उद्योग आणि अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. तर शेअर बाजार नवीन विक्रम स्थापित करीत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)मध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच बाजार भांडवल ३ ट्रिलियन म्हणजेच ३ लाख कोटी रूपयांच्या पुढे गेले (सुमारे ३.०१ ट्रिलियन डॉलर) आहे. सोमवारी म्हणजेच २४ मे रोजी बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज )बाजार भांडवल वाढून २१८.९७ लाख कोटी रूपयांवर (सुमारे ३.०१ ट्रिलियन डॉलर) पोहोचले. मंगळवारी व्यवसायाच्या सुरूवातीला हे २२० लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचले. सोमवारी सेन्सेक्स १११ अंकाच्या वाढीसह ५०,६५१ वर बंद झाले होते. मंगळवारी सकाळी हे २७१ अंकांच्या वाढीसह ५०,९२२.३२ वर खुले झाले.

महत्वाचे म्हणजे यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी बीएसई मध्ये सूचिबद्ध कंपन्यांचा बाजार भाडवल २०० लाख कोटी रूपयांच्या पुढे गेला होता. जेव्हा सेन्सेक्स ने ५०,४७४ ची नवीन पातळी गाठली होती. त्या दिवशी व्यवसाच्या शेवटी गुंतवणूकदारांचा वेल्थ (संपत्ती) २००.११ लाख कोटी रूपयांवर पोहचला होता. बीएसई चे सीईओ आशीष कुमार चौहान यांनी सोमवारी ट्विट करून सांगितले की, ‘बीएसई इंडिया मध्ये सूचिबद्ध सर्व कंपन्यांचा बाजार भांडवल प्रथमच एका दिवसात ३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. बीएसई मध्ये नोंदणीकृत असलेल्या ६.९ कोटींहून अधिक गुंतवणूकदारांचे तसेच, १४०० पेक्षा अधिक दलाल, ६९,०००पेक्षा अधिक एमएफ वितरक आणि ४७०० हून अधिक कंपन्यांचे अभिनंदन. ’

अशा प्रकारे यावर्षी गुंतवणूकदारांची संपत्ती विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. कोरोना संकटात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री केली असली तरी बीएसई च्या बाजार भांडवलाचा हा विक्रम बनला आहे. डिपॉझिटरी डेटानुसार (वितरक माहितीनुसार) यावर्षी १ मे पासून २१ मे दरम्यान विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FPIs) इक्विटींमधून ६,३७० कोटी रूपये बाहेर काढले आहेत, तर कर्ज विभागात १,९२६ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.
The market capitalization of all the companies listed on the Bombay Stock Exchange (BSE) has crossed 3 trillion or $ 3 trillion.


सोन्यात पुन्हा गुंतवणूक करण्याची सरकारची नवीन योजना! –

सरकारने जनतेला दिली स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी!

Social Media