नागपूर : आपल्या अंतराळातील सूर्य(The Sun) हा ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्याच्या निर्मितीमागील रहस्य(Mystery) आणि विज्ञान (Science)समजण्यासाठी नागपुरातील गांधीसागर अर्थात शुक्रवारी तलावाजवळील रमण विज्ञान केंद्र (Raman Science Centre)आणि तारांगणच्या वतीने “द सन: अवर लिव्हिंग स्टार- ”सूर्य आपला जिवंत तारा” या नवीन डिजिटल तारांगण शोचा प्रारंभ खगोलप्रेमींसाठी करण्यात आला आहे.
या शोचे उद्घाटन प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर इस्रो, नागपूरचे उपमहाव्यवस्थापक डॉ.जी. श्रीनिवासन, रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक मनोज कुमार पांडा, विलास चौधरी प्रकल्पाचे शिक्षणाधिकारी, तंत्र अधिकारी महेंद्र वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
हा शो बघण्यासाठी बच्चे कंपनी आणि पालक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसत होती. शो सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दररोज दुपारी 1 ते 5 वाजेदरम्यान असणार आहे.
योग दिनासाठी कस्तुरचंद पार्कची देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये निवड