नागपूरच्या खासगी शाळांमध्ये 580 बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आले आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई होणार असून, त्यांचे वेतन परत घेण्याचे संकेतही दिले गेले आहेत.