देशाच्या विदेशी चलन साठ्यात ६०० अब्ज डॉलर्सचा नवीन विक्रम प्रस्थापित!

नवी दिल्ली : देशाच्या विदेशी चलन साठ्याने ४ जून रोजी समाप्त आठवड्यात ६०० अब्ज डॉलरचा नवीन विक्रम नोंदविला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (आरबीआय) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्या दरम्यान यामध्ये ६,८४२ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे आणि हे ६०५.००८ अब्ज डॉलर्सवर गेले आहे. विदेशी चलन साठ्यात केवळ एका वर्षांतच १०० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. देशाचा विदेशी चलन साठा मागील वर्षी ५ जून रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात ५०० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचला होता.

आरबीआयद्वारा दिलेल्या माहितीनुसार, पुनरावलोकन आठवड्यादरम्यान विदेशी चलन मालमत्तेत (FCA ) ७.३६२ अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. या वाढीसह विदेशी चलन मालमत्तेचे मूल्य वाढून ५६०.८९० अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. एफसीए मध्ये डॉलरसह यूरो, पाउंड आणि येन सारख्या चलनांचा देखील समावेश केला जातो. त्यांच्या मूल्याची गणना देखील डॉलरच्या भावात केली जाते. तथापि, पुनरावलोकनाच्या आठवड्यात देशाच्या स्वर्ण साठ्याचे मूल्य ५०.२० कोटी डॉलर्सने घसरून ३७.६०४ डॉलर्स राहिले आहे.

देशाचा विदेशी चलन साठा ६ एप्रिल २००७ मध्ये समाप्त आठवड्यात २०० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचला होता. त्यानंतर ३०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्यास याला सात वर्षांचा कालावधी लागला होता. विदेशी चलन साठ्याने २८ मार्च २०१४ मध्ये समाप्त आठवड्यात ३०० अब्ज डॉलर्सच्या वर कमाई केली होती. तथापि, त्यामध्ये १०० अब्ज डॉलर्स जोडण्यासाठी केवळ तीन वर्षाहून अधिक कालावधी लागला आणि विदेशी चलन साठा ८ सप्टेंबर २०१७ मध्ये ४०० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचला होता. पुढील अडीच वर्षांत देशाचा विदेशी चलन साठा १०० अब्ज डॉलर्सने वाढून ५ जून, २०२० मध्ये ५०० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचला होता. विदेशी चलन साठ्यात सर्वाधिक वेगाने १०० अब्ज डॉलर्सची एका वर्षातच भर पडली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विदेशी चलन साठ्यातील या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे गेल्या एका वर्षात कोरोनाचे संकट असूनही अर्थव्यवस्थेच्या पायाविषयी विदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम राहिला आहे. कोरोना संकटादरम्यान आर्थिकव्यवस्था सुधारण्यासाठी गेल्या एका वर्षात सरकारने जी पावले उचलली आहेत, त्याच्या सकारात्मक परिणामांबद्दल देखील बहूतांश विदेशी गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांनी सहमती दर्शविली आहे.
Good news for the country’s economy, forex reserves crossed the record $ 600 billion.


बँकांच्या ग्राहकांसाठी आरबीआयची मोठी घोषणा…. – 

SBI, PNB, HDFC, ICICI बँकांच्या ग्राहकांसाठी आरबीआयची मोठी घोषणा….

Social Media