मुंबई, दि 27 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेली 2 वर्षे नागपुरात झालेलं नाही त्यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरराच्या तासात सांगितलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चा प्रश्न उपस्थित केला होता. नागपूरच्या अधिवेशनात अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणाऱ्या भत्यातील वाढीबाबत योग्य विचार केला जाईल असं आश्वासन ही त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिलं.
राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची रखडलेली बिले 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जातील, काही बिलांबाबत तपासणी सुरू आहे, ग्रामीण पाणीपुरवठा योजना बिले न भरल्याने बंद आहेत, ती मात्र अर्धी संबंधित ग्रामपंचायतीने भरलीच पाहिजेत असं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले, अर्धे बिल जिल्हा परिषद भरेल मात्र ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे लागेल असं ते म्हणाले.
नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात कोरोना काळात मुलींना दिलेल्या दिलेल्या ऑनलाईन संगणक प्रशिक्षणात घोटाळा प्रकरणी 15 दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिलं , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आग्रही होते , त्यांनी या संदर्भातील पुरावे सभागृहात दिल्यानंतर मुश्रीफ यांनी हे जाहीर केले.