अमरावती शहरातील उमेश कोल्हे यांच्या खुनाचा तपास एनआयएमार्फत सुरू : देवेंद्र फडणवीस

मुंबई : अमरावती (Amravati)शहरातील उमेश कोल्हे(Umesh Kolhe) यांच्या खुनाबद्दल अमरावती शहर सिटी कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या त्याचा तपास राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण (एनआयए) मार्फत सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ५ जुलै २०२२ रोजीपर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली वाहने, चाकू व आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्याने तपासाची मूळ कागदपत्रे ७ जुलै २०२२ रोजी एनआयएच्या ताब्यात देण्यात आली असून पुढील तपास एनआयएमार्फत करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी लक्षवेधीच्या लेखी उत्तरात दिली.

Social Media