आमदार नितेश राणे अखेर शरण, 2 दिवस पोलीस कोठडीत…

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंनी अखेर आज न्यायालयात शरणागती पत्करली त्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्याने राणेंच्या अडचणीत वाढ झाली होती. आधी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने पुन्हा जामीन फेटाळला. त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र आज राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे यांचा हायकोर्टातील अर्ज मागे घेतल्याचे तसेच नितेश राणे कणकवली कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर कोर्टाचा मान ठेवून मी शरण होण्यासाठी न्यायालयात जात आहे ,मी सरेंडर होण्यासाठी निघालो आहे. काल न्यायालयानं दिलेल्या निकालाचा मी आदर करतो, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. त्यानुसार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले.

सुरुवातीला न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते मात्र त्यावर पोलिसांनी आपल्या ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाला केली अखेर न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यामुळे नितेश राणे आता 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत राहतील .

Social Media