लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही : एम्स अभ्यास

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) अभ्यासानुसार लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही. लस घेतलेल्या व्यक्तीला जर कोरोना संसर्ग झाला तर त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन असे म्हटले जाते. एम्सने हा अभ्यास एप्रिल ते मे दरम्यान केला आहे.

लोकांना कोरोना संसर्ग झाला परंतु कोव्हिडमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही

People contracted corona infection but did not die from covid

या दरम्यान देशात कोरोना संसर्गाची लाट उच्च पातळीवर पोहोचली होती आणि दररोज सुमारे ४ लाख लोक कोरोना संक्रमित आढळत होते. एम्सच्या अभ्यासानुसार, ज्या लोकांनी कोव्हिड-१९ चे दोन डोस घेतले होते, त्या लोकांना कोरोना संसर्ग झाला परंतु कोव्हिडमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही. या अभ्यासात असे म्हटले आहे की, वॅक्सीन घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही. एम्सने ब्रेक थ्रू इन्फेक्शन च्या एकूण ६३ प्रकरणांच्या जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे अभ्यास केला. त्यापैकी ३६ रूग्णांनी लसीचे दोन डोस घेतले होते, तर २७ रूग्णांनी कमीत-कमी एक डोस घेतला होता. या अभ्यासात सहभागी असलेल्या १० रूग्णांनी कोविडशील्ड वॅक्सीन घेतली होती. तर ५३ जणांनी कोवॅक्सीन घेतली होती. यापैकी कोणत्याही रूग्णाचा पुन्हा कोरोना संक्रमित झाल्याने मृत्यू झालेला नाही.

ब्रेक थ्रू इन्फेक्शन ची प्रकरणे

Break through infection cases

अभ्यासानुसार, दिल्ली मध्ये संसर्गाची बहूतांश प्रकरणे एक सारखीच होती आणि संसर्गाच्या प्रकरणात कोरोनाचा B.1.617.2 आणि B.1.17 स्ट्रेन बहूतांश प्रकरणांत आढळून येत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, ब्रेक थ्रू इन्फेक्शन ची प्रकरणे देखील समोर आली होती, परंतु बहूतांश प्रकरणांमध्ये संसर्ग सौम्य होता. कोणत्याही व्यक्तीची स्थिती गंभीर झाली नाही आणि कोणाचाही मृत्यू देखील झालेला नाही.

अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांचे सरासरी वय ३७ वर्ष होते, आणि सर्वांत कमी वयाचा व्यक्ती २१ वर्षांचा होता, तर सर्वांत वयस्कर व्यक्तीचे वय ९२ वर्ष होते. यामध्ये ४१ पुरूष आणि २२ महिलांचा सहभाग होता. कोणत्याही रूग्णाला पूर्वी कोणताही आजार नव्हता. तथापि वॅक्सीनबाबत अजूनही लोकांमध्ये जागरूकता कमी आहे. कोरोना विषाणूच्या लसीपासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे प्राथमिकता म्हणून कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेण्याची आवश्यकता आहे.
No one who got corona infected died even after taking the vaccine: AIIMS Study


Blood Sugar नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन….

रक्तातील पातळी नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन….

Social Media