नागपुरात परिचारिकांचे आंदोलन, उद्यापासून पूर्णवेळ संपावर

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील परिचारिकांनी कालपासून दोन तास कामबंद आंदोलनाला सुरुवात केली असून या आन्दोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.. महाराष्ट्र राज्य परिचरिका संघटने तर्फे परिचारिकांचे राज्यस्तरीय आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कोरोना काळात परिचारिकांना जोखीम भत्ता द्यावा,कोरोना रुग्णांच्या सेवेनंतर सात दिवस विलगीकरणात राहण्याची परवानगी द्यावी, पदनामात बदल करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन हे नागपुरात रुग्णालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे.

उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून उद्यापासून या सरकारी परिचरिका दोन दिवसाच्या संपावर जाणार आहे . आणि त्या नंतर 25 जून पासून बेमुदत संप पुकारला जाणार आहे . गेल्या अनेक वर्षापासून परिचारिकांचे विविध प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत , वारंवार मागण्या करूनही शासन त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे संघटनेला हे आंदोलनाचे शस्त्र उगारावा लागल्याचे महाराष्ट्र राज्य परिचरिका संघटनेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष एकता रंगारी यांनी सांगितले.

Social Media