कॉकटेल चित्रपटातील ‘वरोनिका’ने माझे व्यावसायिकदृष्ट्या आयुष्यच बदलले : दीपिका पादुकोण

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने(Deepika Padukone) तिच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. परंतु या अभिनेत्रीची एक व्यक्तीरेखा जी तिच्या कारकिर्दीसाठी महत्वाचा टप्पा असल्य़ाचे सिद्ध झाले होते ते म्हणजे कॉकटेल चित्रपटातील वरोनिका हे पात्र.! कॉकटेल (Cocktail)चित्रपटातील वरोनिका या पात्राने लोकांच्या मानावर अशी छाप सोडली की लोक नऊ वर्षांनंतरही विसरले नाहीत. कॉकटेल चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ वर्ष लोटली आहेत, परंतु दीपिकाच्या या भूमिकेची चर्चा अजूनही होते.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला ९ पूर्ण होण्याच्या निमित्ताने दीपिकाने तिच्या टर्निंग पॉइंटविषयी भाष्य केले. चित्रपटाविषयी बोलताना दीपिकाने सांगितले की, ‘मला कायमच असे वाटते की जेव्हा तुम्ही प्रत्येक भूमिकेत स्वतःचा एक छोटासा हिस्सा त्यात टाकता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीरेखेतील एक हिस्सा कायम तुमच्यासोबत ठेवता. वरोनिका कायमच मी निभावलेल्या सर्वात विशेष व्यक्तीरेखांपैकी एक असेल. जिने माझे व्यावसायिकदृष्ट्या खूप काही बदलले आहे आणि मला वैयक्तिकरित्या प्रभावित केले आहे.’

तमिळ सुपरहिट चित्रपट ‘रत्सासन’ च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी… – 

जेव्हा दीपिकाला वरोनिका हे पात्र तिच्या बॉलिवूड कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण वळण होते का हे विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, ‘हो..जर एखादी व्यक्तिरेखा लाखो लोकांसमोर गाजत असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी असे होते ज्याची प्रेक्षकांना सहानुभूती होती. हे आठवत दीपिकाने या भूमिकेसाठी कशी तयारी केली याबाबत सांगितले. तिने सांगितले की, जेव्हा मला स्क्रिप्ट वाचण्यास दिली तेव्हा मी गृहीत धरले की हे मीराच्या पात्रासाठी आहे. इम्पियाज अली यांनी एक दिवस मला फोन केला आणि मला वरोनिका ची स्क्रिप्ट पुन्हा वाचण्यास दिली. काही दिवस यावर विचार केल्यानंतर, मला समजले की त्यांना काय म्हणायचे आहे. आणि मला माहित होते की मी यासाठी तयार आहे.

अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित…. – 

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ‘होमी अदजानिया यांनी मला उडण्यासाठी पंख दिले आणि मला विश्वास दिला की मी काहीच चुकीचे करू शकत नाही. त्या विश्वासामुळेच, आम्ही एक असे पात्र तयार करण्यास सक्षम होतो जे आपल्या हृदयात कायम जीवंत राहिल.
On the completion of 9 years of Cocktail, Deepika Padukone said, ‘Veronica’ changed my career.


बीएमसीने सुनिल शेट्टीची अपार्टमेंट केली सील; अभिनेत्याचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित! – 

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान बीएमसीने सुनिल शेट्टीची अपार्टमेंट केली सील; अभिनेत्याचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित!

रकुल प्रीत सिंगने टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्ताचे केले खंडन.. –

टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्तावरून रकुल प्रीत सिंगने व्यक्त केला संताप!

Social Media