केवळ ‘मोदी’ बायोपिक नव्हे ‘बाळासाहेब ठाकरे’ बायोपिकचेही संदिप सिंहच निर्माते : फडणवीसांचा कॉंग्रेसवर पलटवार!

मुंबई : सुशांतसिंह प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या मोदींच्या बायोपिकची निर्मिती करणा-या संदीप सिंहचे नांव आता या चौकशीत आल्याने सीबीआय ड्रग्ज प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करणार आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंह आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे एक छायाचित्र ट्विट केले आहे. ट्विटरवर ट्विट करत सावंत यांनी ‘सुशांत आत्महत्या प्रकरणातील भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

मात्र यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्त्यांचा अभ्यास कमी पडत आहे असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेमाचेही निर्माते होते. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्या सोबत फोटो असेल तर काही फरक पडत नाही. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  सचिन सावंत यांना विधान पारिषदेवर जायची संधी मिळत नाही म्हणून ते निराश आहेत. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

Social Media