नागपूर : राज्यातील राजकीय घडामोडी लक्षात घेता आवश्यकते नुसार आमची वेट अँड वॉचचीच भूमिका राहील,. महाराष्ट्राचे जनतेचे नुकसान होणार नाही , आम्ही सध्याचा राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत अशी प्रतिक्रिया भाजप नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी नागपुरात दिली . ते नागपुरात विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते .
महाराष्ट्रात अस्थिर परिस्थिती आहे, मात्र अशा अस्थिर परिस्थितीमध्येही काही लोक स्थिर मनाने जीआर काढून पैसे कमावण्याच्या कामात लागले आहे, अशी शंका भाजपला आल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपालांना पत्र दिले आणि अशा पत्रावर प्रशासनाकडून खुलासा घेणे हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले .
आम्हाला वाटते की आता महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे… त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही त्यांनी विचारपूर्वक समजून घ्यावं आणि त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी योग्य निर्णय करावा असे मतही यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केले .
भाजपला सध्या तरी आपला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही… आम्ही हे पाहतोय की महाविकासआघाडी त्यांचा अल्पमत केव्हा सिद्ध करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.