२६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी ओव्हल मैदान बंद

मुंबई : मुंबईच्या फोर्ट येथील ए विभागातील विविध खेळांसाठी प्रसिध्द असलेल्या ओव्हल मैदानावर (Oval ground)रोज खेळाडूंची गर्दी असते. मात्र कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने येथे होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. खेळाचे मैदान असल्याने कोरोनाचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे शुक्रवारी, २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

 

युकेतील कोरोना प्रकारचे (युके स्ट्रेन) ५ रुग्ण आढळले

शहर परिसरात या आधी युकेतील कोरोना प्रकारचे (युके स्ट्रेन) ५ रुग्ण आढळले होते. मात्र, हे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यानंतर आता मुंबईत कोरोनाच्या या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून ९० रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून ते पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. मुंबईमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गर्दी होणारी मंगल कार्यालये आणि हॉटेलमधील बुकिंगची माहिती घेऊन तसेच खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थित आहेत कि नाही याची तपासणी करून कारवाई करणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. यामुळे येत्या काळात मंगल कार्यालये, हॉटेल, खासगी कार्यालये पालिकेच्या रडारवर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

महाराष्ट्र व केरळमध्ये कोरोनाचा नवा प्रकार

मुंबईसह राज्यभरात आटोक्यात आलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यात महाराष्ट्र व केरळमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याचे समोर आल्यानंतर चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली असून कठोर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या तरी कोरोनाचा नवा प्रकार आढळलेला नाही. या आधी मुंबईत युकेतील कोरोना प्रकारचे पाच रुग्ण आढळले होते. मात्र, हे सर्व रुग्ण बरे झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी यात नवा विषाणू प्रकारचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून ९० रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून याबाबत संपूर्णपणे खबरदारी घेतली जाते असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

मुंबईमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत गणेशोत्सवानंतर जितके रुग्ण वाढले त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील, अशी शक्यता वर्तवली असून त्याअनुषंगाने मुंबई महापालिका प्रशासनाने सज्ज राहावे. कोविड केंद्रे बंद आहेत किंवा व्हेंटिलेटर आदी सुविधा ज्या वापरल्या जात नाहीत, त्या सुरू आहेत का? त्यांची तपासणी करून यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दाटीवाटीच्या वस्तीत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येण्याची शक्यता असल्याने रुग्णांचे विलगीकरण करता यावे म्हणून पालिकेच्या प्रत्येक २४ विभागात एक अशी २४ विलगीकरण केंद्रे सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कार्यालयात ५० टक्के स्टाफ असावा या नियमाचे पालन केले जावे असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून हा नियम आहे. मात्र आता कोरोना वाढत असल्याने खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकाराक आहे. ५० टक्के उपस्थितीचे नियम पाळले जातात का याची पाहणी करण्यासाठी पालिकेचे पथक आता खासगी कार्यालयांना भेटी देऊन कारवाई करणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

ओव्हल मैदानावर रोज खेळाडूंची गर्दी

मुंबईच्या फोर्ट येथील ए विभागातील विविध खेळांसाठी प्रसिध्द असलेल्या ओव्हल मैदानावर रोज खेळाडूंची गर्दी असते. मात्र कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने येथे होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. खेळाचे मैदान असल्याने कोरोनाचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे शुक्रवारी, २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन इतर मैदाने व सार्वजनिक जागांच्या ठिकाणचीही पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असेही काकाणी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण सुरू आहे. मात्र, कोविन अ‌ॅपच्या तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाचा वेग काहीसा मंदावतो आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी राज्य आणि केंद्र शासनाला कळवण्यात आले आहे. राज्य शासन लवकरच कोविन अ‌ॅपमधील अडचणींसंदर्भात केंद्र सरकारशी संपर्क साधून यावर तोडगा काढेल, असे काकाणी यांनी सांगितले.

Social Media