मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन येत्या सोमवारी ६ डिसेंबर २०२१ रोजी आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणा-या ‘ग्लोबल पॅगोडा’, गोराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात.
मात्र, ‘कोविड – १९’ (ओमिक्रॉन नवीन विषाणू प्रजाती) या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ – ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.
The architect of the Indian Constitution, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s 65th Mahaparinirvan Diwas is next Monday, December 6, 2021. Every year on 6th December, Bharat Ratna Dr. A large number of followers come to greet the memory of Babasaheb Ambedkar.