पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय नियंत्रण कक्ष) येथील कक्षात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.

मंत्रालय नियंत्रण कक्षात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे व्यवस्थापक विशेषकर सुर्यवंशी व कक्ष अधिकारी नितीन मसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी मदतीकरिता मंत्रालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०/२२७९४२२९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९३२१५८७१४३ (वॉट्सअप क्रमांक) तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक (टोल फ्री १०७०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.खडके यांनी केले आहे.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *